शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Ashwini Bidre: बिद्रे यांच्या खुनाबद्दल शिक्षा दिली; परंतु मृत्यू दाखला मिळेना, गोरे कुटुंबीयांना मनस्ताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:05 IST

न्याय देणार नसाल तर इच्छामरण द्या

कोल्हापूर : सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावून दहा महिने उलटल्यानंतरही बिद्रे यांच्या मृत्यूचा दाखला नातेवाईकांना मिळालेला नाही. परिणामी, मृत्यूपश्चातचे लाभ अद्याप नातेवाईकांना मिळालेले नाहीत. त्यामुळे न्याय देणार नसाल तर इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी बिद्रे यांचे पती राजू गोरे (रा. हातकणंगले) यांनी पत्राद्वारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडे केली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!ठाणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे एप्रिल २०१६ पासून बेपत्ता होत्या. तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने साथीदारांच्या मदतीने त्यांचा खून केल्याचे तपासातून उघडकीस आले होते. त्यानुसार उपलब्ध पुरावे आणि साक्षींच्या आधारे पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर बिद्रे यांच्या मृत्यूपश्चात दिले जाणारे लाभ मिळावेत, यासाठी त्यांचे पती गोरे यांनी हातकणंगले ग्रामपंचायत, पनवेल महापालिका, मीरा-भाईंदर महापालिका आणि नवी मुंबई सहायक आयुक्तांकडे मृत्यू दाखल्याची मागणी केली होती. मात्र, शासकीय यंत्रणांनी अद्याप मृत्यूचा दाखला दिलेला नाही. मृत्यूचा दाखला नसल्याने त्यांच्या नातेवाईकांना विमा, फंड, ग्रॅच्युईटी आणि इतर शासकीय लाभ मिळालेले नाहीत.सर्किट बेंचकडून दखलमृत्यूचा दाखला देण्यास होत असलेल्या विलंबाबद्दल गोरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये तक्रार अर्ज दिला आहे. सर्किट बेंचने याची दखल घेतली असून, लवकरच कार्यवाही करू, असे पत्राद्वारे कळवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ashwini Bidre Murder: No Death Certificate, Family Seeks Euthanasia

Web Summary : Despite convictions in Ashwini Bidre's murder, her family still lacks a death certificate. This prevents them from accessing benefits, leading her husband to request euthanasia from the President and Supreme Court.