कर्नाटकचा संतवचनांना काळिमा : श्रीपाल सबनीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 01:07 AM2020-01-13T01:07:46+5:302020-01-13T01:07:53+5:30

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर ...

Sense of Karnataka to Silence: Shripal Sabnis | कर्नाटकचा संतवचनांना काळिमा : श्रीपाल सबनीस

कर्नाटकचा संतवचनांना काळिमा : श्रीपाल सबनीस

Next

बेळगाव : महाराष्ट्रातील साहित्यिकांना इदलहोंडच्या साहित्य संमेलनात सहभागी होण्यास दडपशाहीने बंदी घालणाऱ्या कर्नाटक सरकारने संत कनकदास व संत बसवेश्वर यांच्या वचनांना काळिमा फासला आहे. यासाठी कर्नाटक सरकारचा त्यांच्याच भूमीत ठामपणे उभे राहून मी जाहीर निषेध करतो, असे परखड मत इदलहोंड (ता. खानापूर, जि.बेळगाव) येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी रविवारी व्यक्त केले.
इदलहोंड येथे रविवारी गुंफण सद्भावना साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस होते. कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करून बेळगाव पोलीस प्रशासनाने इदलहोंड येथील साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या सहभागावर बंदी घातली. या पार्श्वभूमीवर सबनीस यांनी खानापूर येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतच सबनीस यांनी इदलहोंड येथील गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचे खानापूर
येथूनच उद्घाटन झाल्याचे जाहीर केले.
कर्नाटकच्या चुकीच्या कृतीने शांततेला धक्का
सबनीस म्हणाले, सीमा भागातील मराठी बांधव मराठी भाषा साहित्य व संस्कृतीचे संवर्धनासाठी झटत आहेत. यामुळेच मी आनंदाने संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले. तथापि कर्नाटक सरकारने दडपशाही करून आम्हाला संमेलनस्थळी जाऊ दिले नाही. कर्नाटक सरकारच्या या चुकीच्या कृतीमुळे शांततेला धक्का लागला आहे. सबनीस म्हणाले, आमचे मराठीवरील प्रेम कानडीच्या द्वेषावर अवलंबून नाही. कानडी ही आमची भगिनी भाषा आहे.
साहित्य वादासाठी नव्हे, संवादासाठी : बागवे
बेळगाव : वेदना असल्याशिवाय साहित्यनिर्मिती होत नाही, हे साहित्य वादासाठी नाही, तर संवादासाठी आहे, असे प्रतिपादन प्रख्यात कवी अशोक बागवे यांनी केले. कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील बलभीम साहित्य अकादमीतर्फे रविवारी आयोजित १४व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बागवे बोलत होते.
कुद्रेमनी(जि.बेळगाव) येथील मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष अशोक बागवे उपस्थित होते.

Web Title: Sense of Karnataka to Silence: Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.