लसीकरणात ज्येष्ठांची आघाडी, तरुणांचा निरुत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:33+5:302021-09-18T04:26:33+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत गुरुवारअखेर शहरातील नागरिकांना दोन लाख ३४ हजार ३३५ पहिल्या डोसचे तर एक लाख १९ ...

लसीकरणात ज्येष्ठांची आघाडी, तरुणांचा निरुत्साह
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत गुरुवारअखेर शहरातील नागरिकांना दोन लाख ३४ हजार ३३५ पहिल्या डोसचे तर एक लाख १९ हजार २४० नागरिकांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणात ४५ ते ५९ वयोगटातील तसेच ६० वर्षांवरील नागरिकांनी आघाडी घेतली असली तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचा मात्र लस घेण्यात निरुत्साह पाहायला मिळत आहे.
दरम्यान, शुक्रवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे २९६० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरातील १८ ते ४४ वयोगटातील लस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ८२ हजार ०८८ इतकी आहे. त्यापैकी ८० हजार ३११ जणांनी पहिला, तर १२ हजार ४३९ जणांनी दुसरा लसीचा डोस घेतला आहे. लसीकरणाचे हे प्रमाण अनुक्रमे २८.५ टक्के व १५.५ टक्के इतके आहे.
४५ ते ५९ वयोगटातील लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या एक लाख ०८ हजार ३६३ आहे. त्यापैकी ६७ हजार १४६ जणांना पहिला तर ४८ हजार २९९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. हे प्रमाण अनुक्रमे ६२ टक्के व ७१ टक्के आहे. साठ वर्षांवरील ७२ हजार २४२ नागरिकांपैकी ६१ हजार ०६९ नागरिकांनी पहिला डोस तर ४२ हजार ०२३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे.