शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

रक्षाबंधनाला नटून-थटून ऑफिसला आल्या, राखी बांधायच्या दिवशीच हातात बेड्या पडल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 16:44 IST

ऐन रक्षाबंधन सणादिवशीच भावाच्या हातात राखी बांधण्याऐवजी या लाचखोर महिला अधिकाऱ्याच्या हातात बेडया पडल्या

कोल्हापूर : रक्षाबंधन सणादिवशी भावाच्या हातात राखी बांधण्याऐवजी आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ महिला  अधिकाऱ्याच्या हातात बेडया पडल्या. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी मंजुरीसाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी संशयित भावना सुरेश चौधरी (वय ५६, रा. औंध पुणे, सध्या रा. नर्सिंग ट्रेनिंग सेंटर, लाईनबझार कोल्हापूर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. या विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी ही माहिती दिली.

रक्षाबंधन असल्याने अन् स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी त्या कार्यालयास नटूनथटून आल्या होत्या. त्यानंतर लगेचच त्यांना लाच घेताना पकडले. कारवाईनंतर त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

कसबा बावडा रोडवरील शासकीय मध्यवर्ती इमारतीत आरोग्य सेवा उपसंचालकांचे कार्यालय आहे. या कार्यालयात आरोग्य विभागातील निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्याने भविष्य निर्वाह निधीतील ९० टक्के रक्कम मिळवण्यासाठी उपसंचालकांकडे अर्ज केला. सहा लाख ७२ हजार रुपये मंजूर करण्यासाठी भावना चौधरी यांनी ६ हजार ७०० रुपये मागितले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. लाचेच्या रकमेतील पाच हजार रुपये तडजोडीअंती देण्याचे ठरले.

याची खातरजमा विभागाकडून शासकीय पंचांच्या समक्ष करण्यात आली. प्रतिबंधक विभागाच्या गुरुवारी दुपारी कार्यालय परिसरात याबाबत लाचलुचपत पथकाने सापळा रचला. त्यानुसार पाच हजारांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडले. ही कारवाई झाल्यानंतर त्यांच्या केबिनमध्ये मोठमोठ्याने झाल्याचे वाद प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

चौधरी यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, अंमलदार शरद पोरे, मयूर देसाई, रूपेश माने, संदीप पडवळ, पोलीस कर्मचारी छाया पाटोळे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण