शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी प्रवासात ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू, सांगली-कोल्हापूर मार्गावर घडली दुर्देवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 15:37 IST

मुजावर हे कोल्हापूरला आपल्या मुलीकडे निघाले होते.

सुरज पाटीलहेरले: कोल्हापूर डेपोच्या एस.टी बस मधून प्रवास करणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. फक्रुद्दीन अब्दुल मुजावर (वय ७९, रा. उदगाव, ता. शिरोळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  सांगलीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये ही घटना घडील. वाहकाने प्रसंगावधान राखून प्रवाशाचा जीव वाचवण्याचा केला प्रयत्न मात्र दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला.अधिक माहिती अशी की ,कोल्हापूर डेपोची एसटी बस (MH-१४-BT-२८६१)  ही सांगलीहून चालक विलास पाटील आणि महिला वाहक यु.आर. सडोले हे कोल्हापूर कडे येत होते. उदगाव (ता. शिरोळ) येथील फक्रुद्दीन अब्दुल मुजावर यांना त्यांच्या मुलाने जयसिंगपूर येथे या एस.टी बस मध्ये बसवले. यावेळी ४० प्रवासी या एसटी बस मधून प्रवास करत होते. मुजावर हे कोल्हापूरला आपल्या मुलीकडे निघाले होते.चोकाक जवळ एसटी बस आली असता मुजावर यांना अस्वस्थ वाटू लागले. अचानक पणे त्यांच्या तोंडाला फेस येऊ लागल्याने  महिला वाहकाने तात्काळ ही माहिती चालकाला दिली. चालकाने एस.टी बस हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी मुजावर यांची तपासणी केली असता ते मृत झाल्याचे घोषित केले. चालक आणि वाहक यांनी या घटनेची माहिती हातकणंगले पोलीस आणि कोल्हापूर येथील डेपो मॅनेजरला कळवली.बसची वेळ निघून गेल्यानंतर बसची वाट पाहत थांबलेल्या मुजावर यांच्या नातेवाईकांनी डेपोमध्ये चौकशी केली असता ही दुर्देवी घटना समजली. नातेवाईकांनी तात्काळ हेरले प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. हातकणंगले पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हातकणंगले येथे पाठवण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHeart Attackहृदयविकाराचा झटका