कोलेकर महाविद्यालयात शुक्रवारी चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:19+5:302021-06-16T04:34:19+5:30

चर्चासत्राचे उद्घाटन संस्थाध्यक्ष जि. प. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांच्याहस्ते होणार आहे. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या माजी ...

Seminar on Friday at Kolekar College | कोलेकर महाविद्यालयात शुक्रवारी चर्चासत्र

कोलेकर महाविद्यालयात शुक्रवारी चर्चासत्र

चर्चासत्राचे उद्घाटन संस्थाध्यक्ष जि. प. सदस्य अ‍ॅड. हेमंत कोलेकर यांच्याहस्ते होणार आहे. बीजभाषक म्हणून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या माजी अधिष्ठाता, मानव्य विद्याशाखा तथा अध्यक्ष राज्यशास्त्र अभ्यास मंडळ डॉ. भारती पाटील, भवन्स गांधी सेंटर आॅफ सायन्स अ‍ॅण्ड ह्युमन व्हॅल्युज भारतीय विद्या भवन बंगळुरूच्या डायरेक्टर डॉ. मीना देशपांडे, राजकीय विश्लेषक तथा राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉ. प्रकाश पवार, पारनेर कॉलेजचे राज्यशास्त्र विभागप्रमुख सह. प्रा. वीरेंद्र धनशेट्टी मार्गदर्शन करणार आहेत.

अध्यक्षस्थान अ‍ॅड. कोलेकर, डॉ. रवींद्र भणगे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, संचालिका डॉ. अर्चना कोलेकर भूषविणार आहेत, अशी माहिती समन्वयक विभागाचे डॉ. एच. एस. कुचेकर व विभागप्रमुख प्रा. ए. ए. देसाई यांनी दिली.

Web Title: Seminar on Friday at Kolekar College