सूतगिरणी विकली, बॅँकेची बाकी राहिली

By Admin | Updated: September 2, 2015 23:40 IST2015-09-02T22:29:49+5:302015-09-02T23:40:55+5:30

संचालकांवर ठपका : वसुली झाली कठीण--जिल्हा बँक गैरव्यवहार-४

Selling a suitcase, the rest of the bank remained | सूतगिरणी विकली, बॅँकेची बाकी राहिली

सूतगिरणी विकली, बॅँकेची बाकी राहिली

सांगली : वसंतदादा सहकारी सूतगिरणीच्या कर्जपुरवठ्यात अनेक त्रुटी असूनही संचालक मंडळाने वेळावेळी ठराव करून या गिरणीवर कृपादृष्टी दाखविली. अनेक वित्तीय संस्थांच्या कर्जाचा डोंगर घेऊन ही सूतगिरणी अवसायनात गेली आणि जून २०११ मध्ये ३२ कोटी ७६ लाखाला तिची विक्रीसुद्धा झाली. जिल्हा बॅँकेच्या कर्जापोटी काही रक्कमच मिळाल्याने या प्रकरणात तब्बल ६ कोटी ६७ लाख ५० हजारांचे नुकसान बॅँकेला झाले. याप्रकरणी आता संचालकांवर ठपका ठेवण्यात आला आहे.
सांगलीतील वसंतदादा सूतगिरणीस १९९८ ते २००१ या कालावधित वेळावेळी कर्जे मंजूर करण्यात आली. या गिरणीस ३१ जानेवारी १९९८ रोजी कार्यकारी समितीने २ लाख ६५ हजारांचे मध्यम मुदत कर्ज मंजूर करून वितरित केले. यासाठी गिरणीची जागा, कारखाना, कार्यालय, इमारत, यंत्रसामग्री अशी मालमत्ता बॅँकेस नोंदणीकृत तारण करण्यात आली. अन्य वित्तीय संस्थांची या गिरणीवर मोठ्या प्रमाणावर कर्जे असल्याने तसेच महाराष्ट्र शासनाची त्यास हमी असल्याने गिरणीच्या सर्व मालमत्तेवर शासनाचे नाव लागले होते. त्यामुळे अवसायकांनी गिरणीच्या संपूर्ण मालमत्तेची विक्री केली आहे. त्यामध्ये बॅँकेने ३ कोटी १५ लाख ४३ लाखांचा दावा मंजूर केला. तरीही या कर्जाची १ लाख ५० हजार रुपयांची बाकी शिल्लक राहिली. १२ मार्च २००१ मध्ये संचालक मंडळाच्या सभेत गिरणीला ८८ लाख ७० हजार रुपयांचे, २४ मार्च २००१ रोजी कार्यकारी समिती सभेत ३ कोटी ४५ लाखांचे, १२ नोव्हेंबर २००१ रोजी संचालक मंडळ सभेत २६ लाखांचे, १२ मार्च २००१ रोजी १ कोटी २० लाखांचे, तर २४ मार्च २००१ रोजी २० लाखांचे क्लिन कॅश क्रेडिट मंजूर केले. या सर्व कर्जाच्या वसुलीसाठी बॅँकेने प्रयत्न करूनही सूतगिरणीच्या विक्रीनंतर कोट्यवधी रुपयांची थकबाकी कायम राहिली. आता गिरणीची विक्री झाल्यामुळे वसुली होणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सूतगिरणीवर कृपादृष्टी दाखविताना तत्कालीन संचालक मंडळाने प्रशासकीय टिपणीकडेही दुर्लक्ष केले. अन्य वित्तीय संस्थांची या गिरणीवर मोठ्या प्रमाणावर कर्जे असताना, तसेच शासनाची त्याला हमी असतानाही जिल्हा बॅँकेने त्यांना कर्जपुरवठा कसा केला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

सूतगिरणीच्या कर्जपुरवठ्यातील तोटा
कर्जमंजुरी तारीख कर्जप्राप्त रक्कम एकूण तोटा
१२ मार्च २00१ ८८.७0 लाख २.४४ लाख १११.७४ लाख
१२ मार्च २00१ १.२0 कोटी ३१५.८३ लाख२७६.८३ लाख
२४ मार्च २00१ २0 लाख ३१५.४३ लाख ४६.४४ लाख
२४ मार्च २00१ ३.४५ कोटी ३१५.४३ लाख १७२.६५ लाख
१२ नोव्हेंबर २0११२६ लाख ३१५.४३ लाख ५८.७८ लाख

Web Title: Selling a suitcase, the rest of the bank remained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.