शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Kolhapur: कागल नव्या सीमा तपासणी नाक्याविरोधात आत्मदहनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 12:33 IST

दुकानगाळे काढून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

कागल : येथील महामार्गावर महाराष्ट्र शासनाच्या वतीने उभारण्यात आलेला खासगी तत्त्वावरील सीमा तपासणी नाका सुरू होण्यासाठी सज्ज झाला असताना, नाक्याशी संबंधित घटकांनी व्यवस्थापनाविरोधात आंदोलनाचा पवित्र घेतला आहे. कागलमधील दोघा युवकांनी येथील दुकान गाळ्यांच्या विषयावरून थेट जिल्हा पोलिसप्रमुखांना निवेदन देऊन आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. सुयोग शिंदे (रा. श्रमिक वसाहत) व बबन रेवडे (रा. बिरदेव वसाहत, कागल) अशी त्यांची नावे आहेत.या नाक्यावर दोन्ही बाजूला मिळून १८ दुकान गाळे आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या सेवासुविधा येथील वाहनचालकांना व देण्याच्या आहेत. या युवकांनी २०१८ मध्ये तत्कालीन व्यवस्थापनाबरोबर लेखी करार करून एका बाजूचे नऊ दुकानगाळे भाडेतत्त्वावर घेतले आहेत व शहरातील इतर लोकांना दिले आहेत. मात्र सध्याच्या व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष करून त्यांना येथून हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. दुसऱ्या बाजूच्या नऊ दुकानगाळ्यांचाही असाच विषय झाला आहे. येथे कंपनीने कुलपे तोडून गाळे ताब्यात घेतले आहेत. कागल शहरातील बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगार मिळणार असून, कंपनी जाणूनबुजून हे गाळे काढून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कागल शहरातील तरुण मंडळांना एकत्र करून याविरोधात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, याबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला आहे.

कराराचे पालन नाहीजिल्ह्यातील मालवाहतूक ट्रक चालक-मालक संघटनेने या नाक्याला विरोध केला असून, सोमवारी आंदोलन होईल म्हणून दिवसभर येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पण आंदोलन झाले नाही. सायंकाळी या नाक्यासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांविषयी बैठक घेण्यात आली. जमिनी संपादन करताना जो करार झाला होता त्याचे पालन केले गेले नाही, असा या शेतकऱ्यांचा आरोप आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका