कोल्हापूर : आपल्या विविध प्रश्नांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील ३० नागरिकांनी उद्या, शुक्रवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आत्मदहन व आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या सर्वांची यादी प्रशासनाने केली असून हे प्रश्न संबंधित विभागांना कळविण्यात आले आहेत.अतिक्रमण, दिव्यांग आयुक्त कार्यालय, बेकायदेशीर दाखले, कूळ वहिवाट, अनुकंपा भरती, वेतनकपात, लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न, सावकारी जाच, गावठाण वाढ, सौर कृषिवाहिनीसाठी जमीन देण्याचा आदेश रद्द करणे, गायरान जमीन मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे आत्मदहन, आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. संबंधिक प्रश्न त्या त्या विभागांकडे पाठवण्यात आले आहेत.
प्रजासत्ताकदिनी कोल्हापुरातील ३० जणांचा आत्मदहन, उपोषणाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 13:29 IST