कागल नगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:16+5:302021-01-08T05:22:16+5:30

सत्ताधारी राष्ट्रवादी शिवसेना अपक्ष आघाडीचे सर्व सभापती झाले. विरोधी भाजप नगरसेवकांना समिती सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. ...

Selection of various subject committees of Kagal Municipality | कागल नगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या निवडी

कागल नगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या निवडी

सत्ताधारी राष्ट्रवादी शिवसेना अपक्ष आघाडीचे सर्व सभापती झाले. विरोधी भाजप नगरसेवकांना समिती सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी या निवडी जाहीर केल्या. नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष सौरभ पाटील मुख्याधिकारी पंडित पाटील प्रमुख उपस्थितीत होते. या सभेत प्रवीण काळबर यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकारांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी पत्रकार जहाँगीर शेख, बा. ल. वंदुरकर, सचिन नाईक, सम्राट सणगर, तानाजी पाटील यांचा सभागृहात सत्कार करण्यात आला.

समिती सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे.

सार्वजनिक आरोग्य समिती : शोभा लाड (सभापती) सौरभ पाटील, लक्ष्मीबाई सावंत

पाणीपुरवठा समिती : अलका मर्दाने (सभापती) विवेक लोटे, आनंदी टोकाशी शिक्षण समिती : जयश्री शेवडे (सभापती) आनंदा पसारे, विजया निंबाळकर

महिला बालकल्याण समिती : नूतन गाडेकर (सभापती), सतीश घाटगे, दीपाली भुरले

बांधकाम समिती : सौरभ पाटील (सभापती), प्रवीण काळबर, प्रवीण कदम, स्थायी समिती नितीन दिंडे (सदस्य) सर्व समितींचे सभापती

Web Title: Selection of various subject committees of Kagal Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.