‘केआयटी’च्या तीन विद्यार्थिनींची फ्युरेशिया कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:00+5:302021-07-14T04:27:00+5:30
फोटो (१२०७२०२१-कोल-केआयटी गर्ल्स सिलेक्शन) विवेकानंद महाविद्यालयात कोरोना रणरागिणीशी संवाद कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयात कोरोना रणरागिणीशी संवाद हा ...

‘केआयटी’च्या तीन विद्यार्थिनींची फ्युरेशिया कंपनीत निवड
फोटो (१२०७२०२१-कोल-केआयटी गर्ल्स सिलेक्शन)
विवेकानंद महाविद्यालयात कोरोना रणरागिणीशी संवाद
कोल्हापूर : येथील विवेकानंद महाविद्यालयात कोरोना रणरागिणीशी संवाद हा कार्यक्रम ऑनलाइन पध्दतीने झाला. त्यासाठी शिक्षण तज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोना रणरागिणी प्रिया पाटील, आंचल कट्यारे , अर्पिता राऊत, सेजल येलडी यांची ओळख प्रियदर्शिनी व अभिजीत यांनी करून दिली. कोरोना रणरागिणीची मुलाखत कॉलेज विद्यार्थिनी सानिका, संस्कार आणि आर्या यांनी घेतली. या मुलाखतीतून त्यांना आलेले अनुभव, त्यांची कार्यप्रणाली, त्यांचे अभ्यासाचे आणि समाज कार्याचे नियोजन, शिकायला मिळालेल्या गोष्टी यांची माहिती मिळाली. या मुलींची जिद्द , चिकाटी व समाजाप्रती असलेली कणव आणि त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडले. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, अशोक करांडे,समीक्षा फराकटे, सुप्रिया पाटील उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास कक्ष समन्वयक डॉ. कविता तिवडे यांनी आभार मानले. तेजस गुरव यांनी सूत्रसंचालन केले.