‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’मध्ये कोल्हापूरसह दहा जिल्ह्यांची निवड
By Admin | Updated: November 6, 2015 00:32 IST2015-11-06T00:32:02+5:302015-11-06T00:32:36+5:30
एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कायर्कारी समिती स्थापन केली आहे.

‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’मध्ये कोल्हापूरसह दहा जिल्ह्यांची निवड
कोल्हापूर : मुलींचा जन्मदर कमी असलेल्या कोल्हापूरसह राज्यातील दहा जिल्ह्यांचा केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ या अभियानात समावेश केला आहे. या अभियानाची सुरुवात २१ फेब्रुवारीला सुरू होणार आहे. सन २०१७ अखेर निवडलेल्या जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये २०११च्या जनगणनेनुसार मुलांमध्ये लिंगगुणोत्तर कमी असणाऱ्या कोल्हापूर (८६३), बीड (८०७), जळगाव (८४२), अहमदनगर (८५२), बुलढाणा (८५५), औरंगाबाद (८५८), वाशी (८६३), उस्मानाबाद (८६७), सांगली (८६७), जालना (८७०) या जिल्ह्यांचा समावेश अभियानात करण्यात आला आहे.
या अभियानासाठी प्रधान सचिव महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर मार्गदर्शन व संनियंत्रणासाठी ‘सुकाणू समिती’ स्थापन केली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कायर्कारी समिती स्थापन केली आहे. जिल्हास्तरावर पीसीपीएनडीटीसंबंधी टास्कफोर्स जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. (प्रतिनिधी)