सुभाष पुरोहित यांच्या छायाचित्राची जागतिक प्रदर्शनासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:24 IST2021-04-16T04:24:45+5:302021-04-16T04:24:45+5:30
कोल्हापूर : येथील ज्येष्ठ छायाचित्रकार सुभाष पुरोहित यांच्या चंद्रपूर येथील नागझिरा अभयारण्यातील छायाचित्राची ग्रीस येथे होणाऱ्या चानिया इंटरनॅशनल फोटोग्राफी ...

सुभाष पुरोहित यांच्या छायाचित्राची जागतिक प्रदर्शनासाठी निवड
कोल्हापूर : येथील ज्येष्ठ छायाचित्रकार सुभाष पुरोहित यांच्या चंद्रपूर येथील नागझिरा अभयारण्यातील छायाचित्राची ग्रीस येथे होणाऱ्या चानिया इंटरनॅशनल फोटोग्राफी फेस्टीव्हलसाठी निवड झाली आहे. हे फेस्टीव्हल जूनमध्ये होणार आहे. रानकुत्र्यांनी केलेल्या हरणाच्या शिकारीचे हे छायाचित्र आहे.
सुभाष पुरोहित हे व्यवसायाने फार्मासिस्ट असून त्यांना छायाचित्रणाचा छंद आहे. गेल्या ४५ वर्षांपासून त्यांनी हा छंद जोपासला असून वयाच्या पंच्याहत्तरीतही ते त्याच उत्साहाने छायाचित्र काढतात. प्रवास करतात. त्यासाठी त्यांनी देशविदेशात भ्रमंती केली असून त्यांची छायाचित्रे जगभरातील विविध प्रदर्शनांसाठी निवडली गेली आहेत. त्यांच्या छायाचित्रांना १५ वेळा नामांकनेदेखील मिळाली आहेत. गतवर्षी त्यांनी नागझिरा अभयारण्याची भ्रमंती केली असून तेथे हे छायाचित्र काढले आहे. जगभरातून आलेल्या अनेक छायाचित्रातून याची निवड झाली आहे.
-
फोटो नं १५०४२०२१-कोल-सुभाष पुरोहित
--
सुभाष पुरोहित ०१
सुभाष पुरोहित यांनी काढलेले हरणाच्या शिकारीचे छायाचित्र.
--