‘केआयटी’च्या सहा विद्यार्थ्यांची अदानी ग्रुपमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST2021-06-02T04:19:00+5:302021-06-02T04:19:00+5:30
कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील सहा विद्यार्थ्यांची अहमदाबाद येथील अदानी ग्रुपच्या डेटा सेंटर बिझनेस, अदानी कॉनेक्स ...

‘केआयटी’च्या सहा विद्यार्थ्यांची अदानी ग्रुपमध्ये निवड
कोल्हापूर : केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील सहा विद्यार्थ्यांची अहमदाबाद येथील अदानी ग्रुपच्या डेटा सेंटर बिझनेस, अदानी कॉनेक्स कंपनीमध्ये निवड झाली आहे.
या कंपनीने प्रथम विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन त्यातील १६ विद्यार्थ्यांची निवड दुसऱ्या फेरीअंती केली. त्यानंतर त्यातील सहा विद्यार्थी कंपनीने निवडले. त्यामध्ये सुकुमार जोशी, अमन फाळके, शमिता कार्वेकर, किरण कांबळे, मंथन येरनाल, शिवतेज सूर्यवंशी यांचा समावेश आहे. त्यांना संगणक विभाग प्रमुख डॉ. ममता कलस, अदानी ग्रुपचे संजय कोठा यांचे मार्गदर्शन लाभले. मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डॉ. उदय भापकर, विभागाचे प्लेसमेंट संयोजक प्रवीण गोसावी, केआयटीचे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जीन्नी यांचे प्रोत्साहन लाभले.
फोटो (०१०६२०२१-कोल-केआयटी कॉलेज)
===Photopath===
010621\01kol_4_01062021_5.jpg
===Caption===
फोटो (०१०६२०२१-कोल-केआयटी कॉलेज)