भूगोल विभागातील सतरा विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:26 IST2021-01-03T04:26:14+5:302021-01-03T04:26:14+5:30
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील जिओ इन्फोमेट्रिक्स (भौगोलिक माहिती प्रणाली) या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या सतरा विद्यार्थ्यांची पनामा ग्रुपच्या ...

भूगोल विभागातील सतरा विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील जिओ इन्फोमेट्रिक्स (भौगोलिक माहिती प्रणाली) या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या सतरा विद्यार्थ्यांची पनामा ग्रुपच्या स्टुडिओ गली आणि जेनिसिस इंटरनॅशनल, डेड्युस टेक्नाॅलाॅजिस अशा राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विविध पदांवर निवड झाली आहे.
यातील काही विद्यार्थ्यांची निवड ही लाॅकडाऊन काळात ‘वर्क फ्राॅम होम’ असतानाही झाली आहे तर काही विद्यार्थ्यांना कृषी कार्यालयात जीआयएस तंत्रज्ञ, विश्लेषक, प्रतिनिधी, विकासक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. यावर्षी कोरोना महामारी असतानाही सुमारे ८० टक्के विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संधी प्राप्त झाली आहे. ही भूगोल विभागासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ऋषिकेश देवकुळे, अनुराग कुलकर्णी, मारुती चिलामे, प्राजक्ता घाटगे, दीपक क्षीरसागर, शितल कातावर, अक्षय पाटील, आशिष पाटील, विशाल पाटील, तुषार वाघ, वैष्णवी साळुंखे, सुशांत सौंदाडे, रागिणी थालाल यांच्या समावेश आहे. या विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डाॅ. एस. डी. शिंदे, समन्वयक डाॅ. एस. एस. पन्हाळकर, डाॅ. पी. टी. पाटील, प्रा. अभिजीत पाटील, प्रा. व्ही. ए. चौगुले, प्रा. सुधीर पोवार यांचे मार्गदर्शन लाभले.