रामचंद्र मुधाळे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:55+5:302021-01-08T05:18:55+5:30

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना पुणे व कोकण विभागाचा संयुक्त मेळावा हुपरी (ता. हातकणंगले) येथे रविवारी पार ...

Selection of Ramchandra Mudhale | रामचंद्र मुधाळे यांची निवड

रामचंद्र मुधाळे यांची निवड

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना पुणे व कोकण विभागाचा संयुक्त मेळावा हुपरी (ता. हातकणंगले) येथे रविवारी पार पडला होता. यावेळी कर्मचाऱ्यांच्या सर्व व्यथा व अडचणी याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. तसेच नवीन वर्षात संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे ठरले होते. त्यानुसार सुभाषराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य उपाध्यक्ष अनिल पवार, विजय भोंडवे, जिल्हाध्यक्ष अभिजित गोरे, पुणे संघटक नौशाद जावळे, उपाध्यक्ष विकास लगाडे यांच्या उपस्थितीत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील विविध नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी यांच्यामधून २७ जणांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

त्यामध्ये हुपरी नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामचंद्र बाबूराव मुधाळे यांची कर्मचारी संघटना पुणे विभागीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

Web Title: Selection of Ramchandra Mudhale