राजवर्धन नाईकची निवड
By Admin | Updated: November 11, 2015 23:41 IST2015-11-11T23:10:34+5:302015-11-11T23:41:07+5:30
राजकोट येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते

राजवर्धन नाईकची निवड
कोल्हापूर : आॅस्ट्रेलिया येथे २१ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी कोल्हापूरचा जलतरणपटू राजवर्धन जयसिंग नाईक यांची भारतीय संघात निवड झाली. राजवर्धन हा २०० मीटर बॅक स्ट्रोक या प्रकारात सहभागी होणार आहे. त्याने यापूर्वी राजकोट येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडियाने आॅस्ट्रेलिया येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी केली. राजवर्धन हा न्यू कॉलेजचा अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. त्याला चेअरमन डी. बी. पाटील, प्राचार्य एन. व्ही. नलवडे, भोगावती साखर कारखाना संचालक हंबीरराव पाटील यांचे प्रोत्साहन, तर प्रशिक्षक निहार अमीन, श्रीकांत जांभळे, बालाजी केंद्रे, प्रा. अमर सासने यांचे मार्गदर्शन लाभले.