महाराष्ट्र राज्य मल्हार सेनेच्या सरसेनापती बबन रानगे यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:19 IST2020-12-09T04:19:56+5:302020-12-09T04:19:56+5:30
महाराष्ट्र राज्य मल्हार सेनेच्या सरसेनापतीपदी वाशी (ता. करवीर) येथील माजी पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव रानगे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड ...

महाराष्ट्र राज्य मल्हार सेनेच्या सरसेनापती बबन रानगे यांची निवड
महाराष्ट्र राज्य मल्हार सेनेच्या सरसेनापतीपदी वाशी (ता. करवीर) येथील माजी पंचायत समितीचे माजी सदस्य बबनराव रानगे यांची तिसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली.
धुळे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र धनगर समाज प्रदेश कार्यकारिणीची बैठक धनगर महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी ग्रामविकास मंत्री आण्णा डांगे, माजी आमदार ॲड. रामहरी रुपनर यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठकीत बबन रानगे यांची मल्हार सेनेच्या सरसेनापतीपदी तिसऱ्यांदा बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
यावेळी माजी आमदार रामराव वडकुते, चिमनभाऊ डांगे, श्रीरामभाऊ पुंडे, डॉ. अलकाताई गोडे, सुनील वाघ, सुभाष सोनवणे, संतोष धनगर, उमेश घुरडे, पुष्पाताई गुलवाडे, युवराज गोडे, बयाजी शेळके, राघू हजारे, बाळासाहेब दाईंगडे, छगन नांगरे याच्यासह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.