शरद इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:24 IST2021-05-06T04:24:22+5:302021-05-06T04:24:22+5:30

महाविद्यालयातील सम्मेद गौराई, स्नेहल पवार, शुभांगी पुजारी, सोमेश मगदूम या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. टाटा पॉवर कंपनीने विद्यार्थ्यांची ऑनलाइन ...

Selection of four students of Sharad Institute | शरद इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांची निवड

शरद इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांची निवड

महाविद्यालयातील सम्मेद गौराई, स्नेहल पवार, शुभांगी पुजारी, सोमेश मगदूम या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. टाटा पॉवर कंपनीने विद्यार्थ्यांची ऑनलाइन टेक्निकल व अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट, तीन टेक्निकल इंटरव्ह्यू व त्यानंतर एच.आर. इंटरव्ह्यू घेऊन निवड केली आहे. सध्या देशामध्ये सोलार, हायड्रो व थर्मल, अशा प्रोजेक्टवर काम सुरू आहे.

महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल अ‍ॅप्टिट्यूड ट्रेनिंग, टेक्निकल स्किलचे वेगळे प्रशिक्षण, तसेच मॉक इंटरव्ह्यू यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू अ‍ॅडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसिपिक ट्रेनिंग, अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाल्याची माहिती ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाने दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य बी.एस. ताशीलदार, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. अभिजित केकरे, प्रा. नेहा सोनी यांच्यासह शिक्षकांचे सहकार्य लाभले.

फोटो - ०५०५२०२१-जेएवाय-०४-यशस्वी विद्यार्थी.

Web Title: Selection of four students of Sharad Institute