डीकेटीई टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांची अहमदाबाद कंपनीमध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:44+5:302021-07-14T04:27:44+5:30
इचलकरंजी : येथील डीकेटीई टेक्स्टाईल डिप्लोमामध्ये शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांची अहमदाबाद येथील अरविंद लिमिटेड कंपनीमध्ये पॅकेजसह निवड झाली. लॉकडाऊनच्या ...

डीकेटीई टेक्स्टाईल डिप्लोमा विद्यार्थ्यांची अहमदाबाद कंपनीमध्ये निवड
इचलकरंजी : येथील डीकेटीई टेक्स्टाईल डिप्लोमामध्ये शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांची अहमदाबाद येथील अरविंद लिमिटेड कंपनीमध्ये पॅकेजसह निवड झाली. लॉकडाऊनच्या काळातदेखील विद्यार्थ्यांचे १०० टक्के क्वॉलिटी प्लेसमेंट व्हावे, यासाठी डीकेटीईमार्फत ऑनलाईन इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येत आहे.
शिवकुमार देसाई, गिरीश पोवार, ओम पांढरे आणि सौरभ कांबळे या विद्यार्थ्यांची निवड झाली. अरविंद लिमिटेड ही वस्त्रोद्योगातील नामवंत कंपनी असून, कॉटन शर्टिंग, डेनिम, नीट आणि बॉटमवेट (खाकी) फॅब्रिक बनविणारी व भारतातील डेनिम निर्मितीतील मोठी कंपनी आहे. दरवर्षी ही कंपनी डीकेटीईतील विद्यार्थ्यांच्या कॅम्पस निवडीसाठी भेट असते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी कंपनीमार्फत ऑनलाईन कॅम्पस् इंटरव्ह्यू आयोजित केले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमतांची चाचणी घेऊन त्यांची निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रा. एस. बी. अकिवाटे, प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. एस. ए. शेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी
१२०७२०२१-आयसीएच-०२- शिवकुमार देसाई
१२०७२०२१-आयसीएच-०३-गिरीश पोवार
१२०७२०२१-आयसीएच-०४-ओम पांढरे
१२०७२०२१-आयसीएच-०५-सौरभ कांबळे