धनगरमोळ्याच्या देविदास शेटके याची अधिकारीपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:27 IST2021-07-14T04:27:57+5:302021-07-14T04:27:57+5:30

प्रचंड पाऊस, ग्रामीण व डोंगराळ भाग, शिक्षणाची व स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याची लहानपणापासूनची जिद्दी देविदास यांनी पूर्ण केले आहे. ...

Selection of Devidas Shetke of Dhangarmolya as an officer | धनगरमोळ्याच्या देविदास शेटके याची अधिकारीपदी निवड

धनगरमोळ्याच्या देविदास शेटके याची अधिकारीपदी निवड

प्रचंड पाऊस, ग्रामीण व डोंगराळ भाग, शिक्षणाची व स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याची लहानपणापासूनची जिद्दी देविदास यांनी पूर्ण केले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही कष्ट करून देविदासने प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी हे पद खेचून आणले आहे.

देविदास शेळके यांचे दहावीपर्यंत शिक्षण माउली हायस्कूलमध्ये तर, अकरावी ते एस. वाय.पर्यंतचे शिक्षण आजरा महाविद्यालयात झाले आहे. टीवायबीएस्सीसाठी ते स्वामी विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे दाखल झाले होते.

त्याठिकाणी बापूजी साळुंखे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये त्यांनी अभ्यास केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्यांची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी वर्ग-२ या पदासाठी निवड झाली आहे. नुकतेच ते ठाणे येथील इंदिरा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये या पदावर रुजू झाले आहेत. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

- देविदास शेटके : १२०७२०२१-गड-०६

Web Title: Selection of Devidas Shetke of Dhangarmolya as an officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.