आेंकारची आॅलिम्पियाड गायन स्पर्धेसाठी निवड

By Admin | Updated: June 11, 2015 00:13 IST2015-06-10T23:47:48+5:302015-06-11T00:13:49+5:30

‘सुगम’मध्ये प्रथम : डिसेंबरमध्ये थायलंड येथे होणार स्पर्धा

Selection for Aankari's Olympiad Singing Championship | आेंकारची आॅलिम्पियाड गायन स्पर्धेसाठी निवड

आेंकारची आॅलिम्पियाड गायन स्पर्धेसाठी निवड

नेसरी : नेसरीचा सुपुत्र व येथील एस. एस. हायस्कूलचा विद्यार्थी आेंकार धनाजी पाटील याची डिसेंबर २०१५ मध्ये थायलंड येथे होणाऱ्या पाचव्या आॅलिम्पियाड गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे येथे २१ मे ते ३१ मे २०१५ अखेर अखिल भारतीय सांस्कृतिक संघातर्फे राष्ट्रीय स्तरावरील सुगम गायन स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला, तर उपशास्त्रीय गायन विभागात दुसरा क्रमांक आला.
देशातील २० राज्यांतून सुमारे सहा हजार विद्यार्थी या स्पर्धेसाठी दाखल झाले होते. प्रसिद्ध गायिका स्नेहा पेटकर यांच्या हस्ते व सितारवादक सुब्रतो डे यांच्या उपस्थितीत आेंकारला प्रशस्तिपत्र व गौरवचिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला. आेंकारला त्याचे गुरुजीप्राचार्य मच्छिंद्र बुवा, वर्षा बुवा, शफिक नाईकवाडी यांचे मार्गदर्शन, तर डॉ. सदानंद पाटणे, पालक धनाजी पाटील व तेजस्विनी पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. त्याच्या या यशाचे कौतुक होत आहे.

Web Title: Selection for Aankari's Olympiad Singing Championship