तळसंदे डीवायपी कृषी अभियांत्रिकीच्या ६५ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:07 IST2021-02-05T07:07:10+5:302021-02-05T07:07:10+5:30
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या ...

तळसंदे डीवायपी कृषी अभियांत्रिकीच्या ६५ विद्यार्थ्यांची निवड
नवे पारगाव : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि कृषी महाविद्यालयाच्या ६५ विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या १८ विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली. यामध्ये कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे १८, तर कृषी महाविद्यालयाच्या ४७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार, प्रा. पी. डी. उके, प्रा. आर. आर. पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी ए. बी. गाताडे, प्रा. उमेश मोहिते, प्रा. एस. आर. सूर्यवंशी, प्रा. के. आर. पोवार, डॉ. आर. व्ही. पवार यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.