‘शरद कृषी’च्या २६ विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:55+5:302021-01-13T05:01:55+5:30
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात ९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ५, डॉ. ...

‘शरद कृषी’च्या २६ विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड
सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठात ९, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ५, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात २, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात १, तसेच इतर कृषी व संलग्न विद्यापीठांमध्ये ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयाने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नियोजनबद्ध पद्धतीने तयारी करून घेतली. त्यामुळे पदवी उत्तीर्ण होणारे ६४ पैकी २६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळाली आहे. तसेच ९ विद्यार्थ्यांची कृषी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये नोकरीसाठी उच्च पदावर नियुक्ती झाली आहे. कृषी क्षेत्रामध्ये ३ विद्यार्थ्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे.
चार वर्षाच्या काळात एकूण ९८ विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. शांतिकुमार पाटील, उपप्राचार्य प्रा. सचिन तोडकर, प्रा. संजय फलके यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शान लाभले.