कोरे अभियांत्रिकीच्या २२ विद्यार्थ्यांची ॲक्सेंचर कंपनीत निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:43+5:302021-07-19T04:16:43+5:30
निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे, तर ०१ विद्यार्थिनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची आहे. ऋतू ...

कोरे अभियांत्रिकीच्या २२ विद्यार्थ्यांची ॲक्सेंचर कंपनीत निवड
निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागाचे, तर ०१ विद्यार्थिनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाची आहे. ऋतू चौगुले या विद्यार्थिनीला ६.५ लाखांचे पॅकेज इतर विद्यार्थ्यांना ४.५ लाखांचे पॅकेज मिळाले.
संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. एस.व्ही. आणेकर यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. पी.जे. पाटील, असिस्टंट प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आर. सी. शिक्केरी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागप्रमुख, प्रा. सी.पी. शिंदे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. जी. व्ही. पाटील आदींचे विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळी : ॲक्सेंचर, पुणे या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, प्राचार्य डॉ. एस.व्ही. आणेकर, ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. पी. जे. पाटील, डॉ. बी.टी. साळोखे, डॉ. जी. व्ही. पाटील उपस्थित होते.