शरद इंजिनिअरिंगच्या १५५१ विद्यार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:20+5:302021-01-08T05:22:20+5:30
शरदमधील विद्यार्थ्यांची टीसीएस, विप्रो, कॉग्निझंट, इन्फोसिस, टीई कनेक्टीव्हीटी, यझाकी, ऑग्निबेनी, अॅमॅझॉन, पॅरॅमेट्रीक्स, टेक महिन्द्रा, अॅक्टी सिस्टिम्स, सिंटेल, असाही इंडिया ...

शरद इंजिनिअरिंगच्या १५५१ विद्यार्थ्यांची निवड
शरदमधील विद्यार्थ्यांची टीसीएस, विप्रो, कॉग्निझंट, इन्फोसिस, टीई कनेक्टीव्हीटी, यझाकी, ऑग्निबेनी, अॅमॅझॉन, पॅरॅमेट्रीक्स, टेक महिन्द्रा, अॅक्टी सिस्टिम्स, सिंटेल, असाही इंडिया ग्लास, ए.सी.सी. लि., मांइन्ड ट्री, हिंद रेक्ट्रीफायर्स, हिंदुजा ग्लोबल, हेक्झावेअर, त्रिवेनी टर्बाइन्स, जारो एज्युकेशन, आय.बी.एम., ग्रे-एटॉम, वेबोनिझ, पार्टीयन टेक्नॉलॉजी, डी.एक्स.सी.लि., झेड एफ स्टिअरिंग गिअर इंडिया, फॉरेशिया, एस.एल.के. सोल्युशन्स, कल्याणी फोर्ज, एम्फासिस, अॅबॉट, किबॉयट, कोजिमी, जस्ट डायल, एल अॅण्ड टी इन्फोटेक, वॅलेओ इंडिया यासह अनेक नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
महाविद्यालयामध्ये प्रथम वषार्पासून प्रत्येक विद्यार्थ्याकडून उद्योगाभिमुख प्रोजेक्ट करुन घेतले जातात. सॉफ्टस्कील व कम्युनिकेशन केंद्रीत अभ्यासक्रम शैक्षणिक वेळापत्रकामध्ये समविष्ट करून विविध उपक्रम राबविले जातात. औद्योगिक क्षेत्रातील मागणीनुसार विविध व्हॅल्यू अॅडेड प्रोग्रॅम्स घेतले जात आहेत.
महाविद्यालयात आयआयटीसारख्या नामवंत केंद्रप्रशासित इन्स्टिट्यूटने तयार केलेले एनपीटीईएल कोर्सेस परिणामकारकरित्या चालविले जातात. परदेशातील अग्रेसर विद्यापीठांबरोबर थेट सामंजस्य करार असल्याने आतापर्यंत महाविद्यालयातील ३२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष त्या विद्यापीठांमध्ये युजी फेलोशिप पूर्ण केली आहे. अॅटोडेस्क, टाटा टेक्नॉलॉजी, बेंटली, व्ही.एल.एस.आय., ओरॅकल, टेक्सास इन्स्ट्रूमेंटस, एनव्हीडीया एज्युकेशन सेंटरसारख्या इंडस्ट्रीसमर्थीत अॅडव्हान्सड लॅब्स अत्यंत प्रभावीपणे चालविले जातात.
महाविद्यालयाने आतापर्यंत १७२ पेक्षा अधिक औद्योगिक संस्थांबरोबर सामंजस्य करार केले आहेत.