‘जलयुक्त शिवार’साठी १२ गावांची निवड

By Admin | Updated: November 21, 2015 00:16 IST2015-11-20T20:43:12+5:302015-11-21T00:16:15+5:30

शाहूवाडी तालुका : पिण्याचे, शेतीचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार

Selection of 12 Villages for 'Water Ship' | ‘जलयुक्त शिवार’साठी १२ गावांची निवड

‘जलयुक्त शिवार’साठी १२ गावांची निवड

मलकापूर : पाणी पातळीत वाढ होण्यासाठी व टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानार्गत शाहूवाडी तालुक्यातील बारा गावांची निवड झाली आहे.तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता, मात्र गेली पाच वर्षे पाऊसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील गावातील पाणी पातळीत घट होऊ लागली आहे, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तालुक्यात कडवी, गेळवडे, मानोली, कांडपण, चांदोली, पालेश्वर अशी छोटी मोठी धरणे आहेत. बारमाही कडवी, वारणा, कासारी नद्या भरून वाहत असतात. मात्र डोंगर कपारीत असणाऱ्या गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणि टंचाईवर मात करण्यासाठी तसेच कोरडवाहु जमीन बागायत होऊन बळीराजा सुखी होण्यासाठी भुगर्भातील पाणी पातळीत वाढ होण्याची गरज आहे. यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानार्गत शाहूवाडी तालुक्यातील सोनवडे, परखंडळे, पणुंद्रे, कोदे, शित्तुर तर्फे मलकापूर,चाळणवाडी-आंबा मानोली कोतोली, तुरूकवाडी, कोळगाव, टेकोली, पिशवी या गावाची निवड झाली आहे.
या गावात नाळाबंडिग पाणी आडवा पाणि जिरवा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. माती बंधारे, सिमेंट बंधारे बांधण्यात येणार आहे. पाणि स्त्रोत बळकटीकरण योजना राबविली जात आहे. ओढे स्वच्छ करणे, आडे लावणे, पाण्याबाबत लोकामध्ये जागृती निर्माण करणे पाणी पातळीत वाढ झाली की ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जाणार
आहेत. डोंगर माथ्यावर बंधारे बांधणे, पाणी अडवणे आदी योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे या बारा गावातील नागरिकांना पिण्याचे व शेतीचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे. ही योजना राबविण्यासाठी शासनाचे कृषी विभागाचे कर्मचारी राबताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Selection of 12 Villages for 'Water Ship'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.