प्रांत कार्यालयाची इमारत जप्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:26 IST2021-01-23T04:26:04+5:302021-01-23T04:26:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : जिल्हा परिषद मालकीच्या येथील प्रांत कार्यालय इमारतीचा घरफाळा १८ लाख २६ हजार ७८२ रुपये ...

प्रांत कार्यालयाची इमारत जप्त करा
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : जिल्हा परिषद मालकीच्या येथील प्रांत कार्यालय इमारतीचा घरफाळा १८ लाख २६ हजार ७८२ रुपये थकीत आहे. त्या वसुलीसाठी प्रांत कार्यालयाच्या इमारतीवर जप्तीची कारवाई करावी. तसेच राहण्यासाठी दिलेल्या सदनिकेचा कर वसूल करावा; अन्यथा संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना दिले.
निवेदनात, प्रांत कार्यालय इमारतीचा सन २००९ पासून घरफाळा थकीत आहे. वारंवार नगरपालिकेने मागणी करूनही घरफाळा भरला जात नाही. या कार्यालय इमारतीचा वार्षिक कर आकारणी रक्कम ७६ हजार ३०२ इतकी आहे. त्या इमारतीवरील दंड व व्याजासह १८ लाख २६ हजार ७८२ रुपये इतकी येणे बाकी आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार इमारत जप्त करावी. मुदतीत घरफाळा भरला नाही, तर इमारतीचा लिलाव करून थकीत घरफाळा वसूल करावा.
दरम्यान, राजाराम स्टेडियमजवळील नगर परिषदेची सदनिका ही सन २००४ पासून प्रांताधिकारी म्हणून येणा-या अधिका-यांच्या ताब्यात असते. त्याचे भाडे, फाळा भरला जात नाही. त्याची कायदेशीर तपासणी करून त्यामध्ये कुचराई आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे म्हटले आहे.