शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
2
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
3
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
4
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
5
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
6
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
7
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
8
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
9
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
10
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
11
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
12
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
13
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
14
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
15
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
16
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
17
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
18
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
19
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
20
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

परीक्षार्थ्यांकडून ‘भारताचे संविधान’ला सर्वाधिक मागणी वाचकांचीही पसंती : शासकीय मुद्रणालयात सातवी आवृत्ती उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 1:08 AM

कोल्हापूर : भारतीय राज्यघटना अर्थात ‘भारताचे संविधान’ या पुस्तकाला आजही वाचकांची पसंती आहे. भारतीय लोकशाहीचा मूलाधार असलेले हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध

कोल्हापूर : भारतीय राज्यघटना अर्थात ‘भारताचे संविधान’ या पुस्तकाला आजही वाचकांची पसंती आहे. भारतीय लोकशाहीचा मूलाधार असलेले हे पुस्तक इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असून, एमपीएससी, यूपीएससीच्या परीक्षार्थ्यांकडून त्याला सर्वाधिक मागणी आहे.

राज्यघटनेच्या तरतुदींनुसार येथील लोकशाही, राज्यव्यवस्था, धर्मनिरपेक्षता जपली जाते. राज्यघटनेचे लेखन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण झाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारताने तिचा स्वीकार केला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘भारताचे संविधान’ हे पुस्तक केवळ मराठीत होते. मात्र, अभ्यासकांसह बºयाच परभाषिक नागरिकांना ते समजून घेण्यात अडचणी येत होत्या.

वाचकांच्या मागणीमुळे २०१४ साली या पुस्तकाची इंग्रजी आणि मराठी अशी द्विभाषी आवृत्ती भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी तयार केली आहे. संवैधानिक जनादेशाची पूर्तता व्हावी, जनतेला या देशातील कायद्यांची माहिती व्हावी, त्यांना त्यांच्या प्रादेशिक राजभाषेमध्ये ते समजून घेता यावेत, हा यामागील उद्देश होता. या आवृत्तीत संविधानातील (अठ्ठ्याण्णवावी सुधारणा) अधिनियम २०१२ यांच्या तरतुदीसह सर्व सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकांचा १५ आॅगस्ट, २६ जानेवारीच्या दरम्यान सर्वाधिक खप होतो. भेट म्हणून देण्यासाठीही त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.

हे पुस्तक ४१७ रुपयांना असून, २०१४ सालापासून आजतागायत अंदाजे १३०० च्या आसपास पुस्तकांची विक्री ताराबाई पार्क येथील शासकीय मुद्रणालयातून करण्यात आली आहे. या पुस्तकाची छपाई केंद्र शासनाच्यावतीने केली जात असल्याने विक्रीतून मिळालेली रक्कमही केंद्राकडे जमा केली जाते. ‘भारताचे संविधान’सह साहित्य संस्कृती मंडळ, दर्शनिका विभाग, भाषा संचालनालय आणि शासनाचे सर्व अधिनियम (जीआर) यांची छपाई शासकीय मुद्रणालयातून केली जाते.बदलानुसार सुधारित आवृत्ती‘भारताचे संविधान’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९७९ साली निघाली. दुसरी १९८३, तिसरी १९८८, चौथी १९९२, १९९६, पाचवी २००२, सहावी २००६, २०११ आणि २०१२ साली; तर सातवी आवृत्ती २०१४ साली काढण्यात आली आहे. राज्यघटना लिहिली गेली त्यावेळी देशातील आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक स्थिती वेगळी होती. त्यानंतर समाजव्यवस्थेत कालानुरूप बदल होत गेले. या बदलांसाठी म्हणून राज्यघटनेतील विविध कलमांमध्ये वेळोवेळी बदल होत गेले. तरतुदी बदलत गेल्या, कायद्यांमध्ये बदल सुचविले गेले. आजतागायत ही बदलांची प्रक्रिया सुरूच आहे. त्या बदलांनुसार पुस्तकाच्या आवृत्त्या काढल्या आहेत. 

‘भारताचे संविधान’ या पुस्तकाला विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांतील नागरिकांकडून मोठी मागणी आहे. इंग्रजी आणि मराठीमध्ये हे पुस्तक असल्याने ते समजून घेण्यासाठी अधिक सोपे आहे. मागणीनुसार पुस्तकाची छपाई केली जाते. याशिवाय बाबासाहेब आंबेडकर व शाहू गौरवग्रंथ या पुस्तकांची अधिक विक्री होते.- संजय वायचळ, व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय