शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत असतानाच इमारतीला लागली आग; कुवेतमध्ये ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू
2
४-५ महिने थांबा, मला सरकार बदलायचंय; शरद पवारांचं मोठं विधान, मोदींवर निशाणा
3
ओडिशात पहिल्यांदाच BJP सरकार; मोहन चरण माझी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ...
4
Maharashtra Politics : अजित पवार बारामतीमध्ये दीड लाख मतांनी जिंकतील; सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
5
भारतापेक्षा ३ पटीनं अधिक पैसे; कुवैतमध्ये छोट्या कामासाठी मिळतो 'इतका' पगार
6
महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई! माजी आमदार नारायणराव मुंडे ६ वर्षांसाठी निलंबित
7
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारताने टॉस जिंकला अन् प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहा कोणाला दिली संधी, कॅप्टनची माघार
8
"मोदी-शाहांसमोर बोलण्याची शिंदे-फडणवीस, अजित पवारांची हिंमत नाही, महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय"
9
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंचं नाव आघाडीवर का?; जाणून घ्या कारणं
10
मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी फडणवीस निभावणार निर्णायक भूमिका; भुजबळांबद्दल म्हणाले...
11
Ration Card Aadhar Card : सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा! रेशन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढवली
12
मोठी बातमी: मविआचा तिढा सुटला; विधानपरिषद निवडणुकीतील दोन उमेदवारांकडून अर्ज मागे 
13
"मी साधा माणूस, मला देवाकडून कुठलाही आदेश येत नाही"; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला
14
Maratha Reservation : "थोडं सबुरीने घ्या आणि सरकारला वेळ द्या"; मनोज जरांगे पाटलांना केंद्रीय मंत्र्यांची विनंती
15
मुंबईकर सुसाट! कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यात एका दिवसात २०,४५० वाहनांचा प्रवास
16
कुवेतमध्ये इमारतीला भीषण आग; ४१ जणांचा मृत्यू, अनेक भारतीयांचा समावेश
17
घरात फ्रिज आणि भिंतीमध्ये केवढी जागा असावी?; 'ही' चूक केल्यास लवकर खराब होईल कंप्रेसर 
18
T20 World Cup 2024 IND vs USA Live Match : भारत-अमेरिका सामना रद्द झाल्यास पाकिस्तानची नौका बुडणार; पावसाने वाढवली शेजाऱ्यांची धाकधुक 
19
इटलीमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना; PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी खलिस्तान्यांचे कृत्य
20
उद्धव ठाकरेंनंतर नायडूंनी 'करून दाखवलं'; जे लालू यादव, मुलायम यांनाही जमलं नाही

सभासदांचे पाठबळ पाहून विरोधकांना पोटशूळ

By admin | Published: December 23, 2015 12:51 AM

चंद्रदीप नरके : म्हासुर्ली येथे प्रचार सभा

कोल्हापूर : सहवीज प्रकल्प उभारल्याबद्दल सभेत कौतुक करणारे आता कर्जाचा कांगावा करीत आहेत. विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच मुद्दे नसल्याने ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ हा एकच उद्योग सुरू आहे. पारदर्शक कारभारामुळे सभासदांचे मिळत असलेले पाठबळ पाहून त्यांना पोटशूळ उठल्याची टिका आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. कुंभी-कासारी साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ म्हासुर्ली (ता. राधानगरी) येथे सभेत ते बोलत होते. नरके म्हणाले, विधानसभेचे राजकारण आपण कधीही कारखान्यापर्यंत नेले नाही, उलट आमदारकीचा उपयोग कारखान्याच्या प्रगतीसाठी केला. त्यामुळेच तेरा महिन्यांत सहवीज प्रकल्प सुरू करण्याचा विक्रम करू शकलो; पण काही मंडळी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आरोप करीत सुटले आहेत. सहानुभूती मिळविण्यासाठी पैसे गोळा करण्याची स्टंटबाजी सुरू केली आहे; पण याला ‘कुंभी’चे सूज्ञ सभासद भीक घालणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कारखान्याचे उत्पन्न वाढले, तर सभासदांना भविष्यात जादा दर देता येईल, याच भावनेतून सहवीज प्रकल्प उभा केला. गाळप क्षमता वाढविली. पाच वर्षांत प्रकल्पाच्या संपूर्ण कर्जाची परतफेड करणार आहे. काटकसरीचा कारभार करीत गेल्या दहा वर्षांत कारखान्याची केलेली प्रगती विरोधकांच्या डोळ्यांत खुपत आहे. सभासदांनी अशा प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करावे, असे आवाहनही आमदार नरके यांनी केले. यावेळी माजी संचालक दगडू बोगरे, आबा रामा पाटील, आनंदा पाटील, विलास पाटील, प्रकाश दळवी, सुरेश पाटील, बाजार समितीचे संचालक सर्जेराव पाटील, ‘म्हासुर्ली’चे सरपंच राजेंद्र सावंत, दगडू चौगले, भिकाजी भित्तम, युवराज पाटील, के. डी. पाटील, ज्ञानदेव पाटील, अजित बच्चे, आर. पी. पाटील, संजय मोरे, उमेदवार, सभासद उपस्थित होते. नरके पॅनेलच्या उमेदवारांसह गवशी, म्हासुर्ली, पणोरे, गोगवे, कोदवडे, वाघुर्डे, नवलववाडी, मोरेवाडी, सावर्डे, मल्हारपेठ येथे प्रचारदौरा काढण्यात आला.