शिवसेनेचे कार्य घराघरांत पाेहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:46+5:302021-07-21T04:16:46+5:30

गांधीनगर : सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरते. त्यामुळे शिवसेनेचे कार्य घराघरांत पोहोचवा, असे आवाहन ...

See the work of Shiv Sena in every house | शिवसेनेचे कार्य घराघरांत पाेहोचवा

शिवसेनेचे कार्य घराघरांत पाेहोचवा

गांधीनगर : सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेहमीच रस्त्यावर उतरते. त्यामुळे शिवसेनेचे कार्य घराघरांत पोहोचवा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केले. ते गांधीनगर-चिंचवाड रस्त्यावरील विठ्ठल मंदिरात आयोजित केलेल्या शिवसंपर्क अभियानप्रसंगी बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, वाहतूक संघटनेचे जिल्हा संघटक दिनेश परमार, तालुकाप्रमुख राजू यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुजित चव्हाण म्हणाले, शिवसेना ही सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. त्यामुळे या अभियानअंतर्गत "गाव तिथे शाखा", "घर तिथे शिवसैनिक" हे ब्रीदवाक्य घेऊन शिवसैनिकांनी पक्षवाढीसाठी कार्यरत राहिले पाहिजे. वाहतूक सेनेचे मंजित माने, जिल्हाप्रमुख दिनेश परमार, तालुकाप्रमुख राजू यादव, दक्षिण शहरप्रमुख शिवाजी जाधव, युवा सेनेचे मंजित माने यांनी या शिवसंपर्क अभियानाचा हेतू स्पष्ट केला. या कार्यक्रमास विभाग प्रमुख वीरेंद्र भोपळे, गांधीनगर वाहतूक संघटनेचे शाखा प्रमुख गणेश सुतार, गणेश कोळी, अतुल साळुंखे, मारुती लोहार, शिवसेना गांधीनगर शाखाप्रमुख बाळासाहेब नलवडे, दत्ता फराकटे, पुंडलिक गोते, दीपक पोपटांनी, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

फोटो : २० गांधीनगर शिवसेना

गांधीनगर येथे शिवसेनेच्या संपर्क अभियानप्रसंगी जिल्हाप्रमुख संजय पवार, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, राजू यादव, वीरेंद्र भोपळे, गणेश सुतार व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: See the work of Shiv Sena in every house