शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर रेल्वेस्थानकांवर पहा आता ‘ऐतिहासिक कोल्हापूर’चे दर्शन, मध्य रेल्वेचा उपक्रम; पर्यटकांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 19:51 IST

प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनस्थळांची ओळख रेल्वे प्रवाशांना होऊन पर्यटनात वृद्धी व्हावी, या उद्देशाने मध्ये रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर ‘कलापूर एक्सप्रेस’ या उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत या स्थानकावरील भिंतींवर ऐतिहासिक कोल्हापुरातील पर्यटन स्थळे चित्ररूपात पाहण्यास मिळणार आहे.ऐतिहासिक करवीरनगरीत येणाऱ्या पर्यटकांना येथील सांस्कृतिक व पर्यटनांची ...

प्रदीप शिंदेकोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनस्थळांची ओळख रेल्वे प्रवाशांना होऊन पर्यटनात वृद्धी व्हावी, या उद्देशाने मध्ये रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयामार्फत छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर ‘कलापूर एक्सप्रेस’ या उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत या स्थानकावरील भिंतींवर ऐतिहासिक कोल्हापुरातील पर्यटन स्थळे चित्ररूपात पाहण्यास मिळणार आहे.

ऐतिहासिक करवीरनगरीत येणाऱ्या पर्यटकांना येथील सांस्कृतिक व पर्यटनांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. या अंतर्गत कोल्हापूर जिल्हा आणि परिसरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा, वारसा दर्शविणाºया स्थळांची स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून चित्रे काढून घेतली जाणार आहेत. ती चित्रे स्थानकावरील विविध भिंतींवर, प्रतीक्षा कक्षात लावण्यात येणार आहेत.यासाठी कोल्हापुरातील ३० चित्र कलाकारांशी रेल्वे प्रशासनाने संपर्क साधला आहे. त्यांच्यामार्फत तीन दिवसांमध्ये विविध ठिकाणची चित्रे काढून घेण्यात येणार आहेत. या माध्यमातून येथील ऐतिहासिक वारशांचा पुन्हा एकदा चित्ररूपात जतन केले जाणार आहे. पर्यटकांना कोल्हापूरची ओळख तर होईलच; पण स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी मोठा फायदाही होणार आहे.शुक्रवारी या उपक्रमाची सुरुवातकोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावर उद्या, शुक्रवारी सकाळी ११ वाजता सबंधित कलाकारांना चित्रकलेचे साहित्य वितरण केले जाणार आहेत. ज्येष्ठ चित्रकार शामकांत जाधव, विलास बकरे, के. आर. कुंभार, डॉ. नलिनी भागवत या मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे.ऐतिहासिक स्थळे....अंबाबाई मंदिर, भवानी मंडप, पन्हाळा, जोतिबा, विशाळगड, पंचगंगा नदीघाट, साठमारी, गंगावेश, दूधकट्टा, शाहू जन्मस्थळ, खासबाग, कुस्ती मैदान, केशवराव भोसले नाट्यगृह, नवीन राजवाडा, टेंबलाई मंदिर, कात्यायनी, रंकाळा, रामलिंग, बाहुबली, नृसिंहवाडी, खिद्रापूर, मसाई पठार, पांडव लेणी, इत्यादी पर्यटनस्थळांची यासाठी निवड केली आहे.

रेल्वे विभागाच्या स्वच्छ व सुंदर या उपक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाला या वास्तववादी चित्रांच्या माध्यमातून पुन्हा एकदा उजळा मिळणार आहे. स्थानिक कलाकारांना या माध्यमातून एक प्रकारे प्रेरणा ही मिळणार आहे.- कृष्णात पाटील,विभागीय रेल प्रबंधक (वाणिज्य) पुणे, मध्य रेल्वे

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे