अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा निकाल लांबला

By Admin | Updated: July 29, 2014 00:03 IST2014-07-28T23:46:57+5:302014-07-29T00:03:02+5:30

तांत्रिक बाबींमुळे संबंधित अभ्यासक्रमांचे निकाल लांबले

The second year of engineering took away the results | अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा निकाल लांबला

अभियांत्रिकी द्वितीय वर्षाचा निकाल लांबला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी विद्याशाखेच्या द्वितीय वर्षातील सिव्हील, मेकॅनिकल अभ्यासक्रमांच्या परीक्षा होऊन दीड महिना उलटत आला, तरी अजूनही निकाल जाहीर झालेला नाही.
द्वितीय वर्षातील अभ्यासक्रमांच्या परीक्षा जूनमध्ये झाल्या. त्यानंतर या विद्याशाखेच्या प्रथम, तृतीय तसेच बी. ई.च्या अंतिम वर्षातील निकाल जाहीर झाले. मात्र, सिव्हील आणि मेकॅनिकल अभ्यासक्रमांचा निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. निकाल लवकरजाहीर व्हावा, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. दरम्यान, याबाबत परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अभियांत्रिकीचे विविध १७ अभ्यासक्रम आहेत. त्यातील सिव्हील आणि मेकॅनिकलवगळता अन्य अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत. काही तांत्रिक बाबींमुळे संबंधित अभ्यासक्रमांचे निकाल लांबले आहेत. येत्या आठवड्यात या अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर करण्याच्यादृष्टीने परीक्षा विभागाचे कामकाज सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The second year of engineering took away the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.