शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीचा दुसरा कोटा जाहीर होणे धूसर, ६० लाख टन निर्यातीचे करार; पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 13:44 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : देशातील साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने निर्यातीचा दुसरा कोटा जाहीर होण्याची शक्यता धूसर झाली आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात जाहीर केलेल्या ६० लाख टन निर्यात कोट्याचे करार महिनाभरापूर्वीच पूर्ण झाले आहेत. यातील ३७ लाख ७५ हजार टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे.अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे यंदा देशातील उसाच्या वजनात घट होऊन साखरेचे उत्पादनही घटले आहे. परिणामी साखरेचे देशातील उत्पादन ३३५ लाख टनाच्या आसपास राहील असा अंदाज आहे. इथेनॉलकडे वळविल्या जाणाऱ्या ४५ लाख टन साखरेचा यात समावेश नाही. देशाची साखरेची गरज, प्रत्यक्षातील निर्यात पाहता पुढील हंगामाच्या सुरुवातीला ६० ते ६५ लाख टन साखर शिल्लक राहण्याची शक्यता आहे. जी नव्या हंगामातील पहिल्या अडीच तीन महिन्यांची गरज भागविण्यासाठी आवश्यक असते. हंगामातील उत्पादनाचा अंदाज घेऊन आणखी १० लाख टन साखर निर्यातीला केंद्र सरकारकडून परवानगी दिली जाऊ शकते असे संकेत सरकारी सूत्रांनी दिले होते; मात्र प्रत्यक्षात साखर उत्पादनाचे येणारे आकडे पाहता ही शक्यता आता धूसर झाली आहे.निर्यातीचा विचार करता ९ मार्चपर्यंत ४३ लाख ९० हजार टन साखर निर्यातासाठी बाहेर पडली आहे. यातील ३७ लाख ७५ हजार टनांची प्रत्यक्षात निर्यात झाली आहे. उर्वरित १२ लाख ७५ हजार टन साखर जहाजात किंवा प्रवासात आहे असे ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनने म्हटले आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीआंतरराष्ट्रीय बाजारात सध्या ४२ ते ४५ रुपयांच्या दरम्यान साखरेचे दर आहेत. केंद्र सरकार निर्यातीचा आणखी एक कोटा जाहीर करेल आणि वाढलेल्या दराचा फायदा आपल्याला मिळू शकेल असे साखर कारखानदारांना वाटत होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्या पदरी निराशाच येणार आहे.महाराष्ट्रात सर्वाधिक घटमहाराष्ट्रात इथेनॉलकडे वळविल्या जाणाऱ्या साखरेसह १५० लाख टन उत्पादन होईल असा अंदाज हंगामाच्या सुरुवातीला वर्तविला गेला होता; मात्र उसाच्या वजनातील घट आणि साखर उताऱ्यातील घट पाहता हे उत्पादन आता ११५ लाख टनापर्यंतच राहील असा अंदाज आहे.

साखर निर्यातीचा दुसरा कोटा जाहीर होण्याची शक्यता दिसत नसली तरी देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या दरात थोडीफार वाढ होऊ शकते. -विजय औताडे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने