पहिली पत्नी असताना शेजारच्या युवतीबरोबर दुसरे लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:20 IST2020-12-26T04:20:41+5:302020-12-26T04:20:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : पहिली पत्नी असतानाही बेकायदेशीरपणे शेजारच्या युवतीबरोबर दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत वाद निर्माण ...

पहिली पत्नी असताना शेजारच्या युवतीबरोबर दुसरे लग्न
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : पहिली पत्नी असतानाही बेकायदेशीरपणे शेजारच्या युवतीबरोबर दुसरे लग्न केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबांत वाद निर्माण झाला. यातून रागाने बघणे व खुन्नस देत असल्याने गंभीर गुन्हा होऊ नये, याची खबरदारी म्हणून गावभाग पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता सात दिवस स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.
अनिल रामचंद्र काजवे (वय ३७) व अमोल विलास काजवे (दोघे रा. आसरानगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची तक्रार तौफिक राजेन्नावर यांनी दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अनिल काजवे याने पहिले लग्न झालेले असतानाही शेजारच्या युवतीबरोबर दुसरा विवाह केला. त्या कारणावरून काजवे आणि संबंधित युवतीच्या कुटुंबीयांत एकमेकांकडे रागाने बघणे व खुनशी वृत्ती दिसत होती. या कारणावरून अनिल व अमोल या दोघांना अटक केली. त्यांच्यावर घातक शस्त्र बाळगणे व संबंधित युवतीच्या नातेवाइकांची मोटारसायकल पेटवून देणे याबाबत यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. पुन्हा मोठी घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली.