अकरावीची दुसरी यादी आज प्रसिद्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:25 IST2021-09-25T04:25:25+5:302021-09-25T04:25:25+5:30

कोल्हापूर : शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी निवड यादी आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता जाहीर ...

The second list of eleven will be released today | अकरावीची दुसरी यादी आज प्रसिद्ध होणार

अकरावीची दुसरी यादी आज प्रसिद्ध होणार

कोल्हापूर : शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी निवड यादी आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता जाहीर होणार आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या संकेतस्थळावर केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडून ऑनलाइन यादी जाहीर केली जाईल. त्यानुसार संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाहीदेखील सुरू होणार आहे, अशी माहिती समितीचे सचिव सुभाष चौगुले यांनी शुक्रवारी दिली.

प्राधान्यक्रम दिलेले आणि हवे असणारे महाविद्यालय मिळाले नसल्याने ३१४५ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित केले नाहीत. त्यामुळे रिक्त राहिलेल्या १०४६९ जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय समितीने दुसऱ्या फेरीची प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू केली. त्याअंतर्गत नव्याने अर्ज करणे, अर्जात बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामध्ये एकूण ८३६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले. त्यांच्यासह एकूण ५२७८ विद्यार्थ्यांचे दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश अर्ज आहेत. त्यांची निवड यादी शनिवारी जाहीर केली जाणार आहे. यादी जाहीर झाल्यानंतर या महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही सुरू होईल. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी मंगळवार (दि. २८) पर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करायचे आहेत.

Web Title: The second list of eleven will be released today