शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘ओखी’नंतर शनिवारी दुसऱ्या चक्रीवादळाचा तडाखा : रामचंद्र साबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 17:21 IST

‘ओखी’ वादळ शमते न शमते तोच शनिवार (दि. ९) पासून दुसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावणार आहे. हे वादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार असल्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला त्याचा फटका बसणार असल्याची माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी कोल्हापुरात दिली.

ठळक मुद्देखराब हवामानाचा वेलवर्गीय पिकांबरोबरच रब्बीला फटकाचक्रीवादळ मुंबईच्या दिशेने आगेकूच करत असून त्याचा ताशी वेग १८ किलोमीटर

कोल्हापूर : ‘ओखी’ वादळ शमते न शमते तोच शनिवार (दि. ९) पासून दुसरे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंगावणार आहे. हे वादळ पूर्व किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकणार असल्याने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला त्याचा फटका बसणार असल्याची माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी कोल्हापुरात दिली.

डॉ. साबळे एका खासगी कार्यक्रमानिमित्त मंगळवारी कोल्हापुरात आले होते, त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. डॉ. रामचंद्र साबळे म्हणाले, ‘ओखी’ वादळाने गेले तीन-चार दिवस दक्षिण भारतात धुमाकूळ घातला आहे. चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने आगेकूच करत असून त्याचा ताशी वेग १८ किलोमीटर आहे.

मुंबईच्या उत्तरेच्या बाजूने गुजरात, सूरतपर्यंत वादळ पुढे जाणार असून त्याचा फटका रायगड, पालघरसह नंदूरबार जिल्ह्यांना बसणार आहे. या पावसाने रब्बी पिकांना फटका बसणार आहे. वेलवर्गीय दोडका, काकडी, कारली या पिकांना किडीचा प्रादुर्भाव जाणवणार आहे. हरभरा, गहू या रब्बी पिकांनाही त्याची झळ सहन करावी लागणार असून हरभऱ्यावर घाटी अळीचा प्रादूर्भाव होणार आहे.‘ओखी’ चक्रीवादळातून आपण सावरतो न सावरतो तोच शनिवारपासून दुसरे चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे. बंगालच्या उपसागरात हवेचा दाब कमी झाल्याने चक्री वारे तयार होऊन वादळ होणार आहे. या वादळाचा फटका पश्चिम महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात बसू शकतो; पण वादळाची तीव्रता ‘ओखी’पेक्षा कमी असेल, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले.

ढगाळ वातावरण उसाला पोषकचढगाळ वातावरण ऊसपिकास पोषक आहे. आर्द्रता वाढत उसाची वाढ चांगली होती. कोरड्या हवामानात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक असतो, असेही डॉ. साबळे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळkolhapurकोल्हापूर