Live: ओखी चक्रीवादळ तडाखा : मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू, किनारपट्टी परिसरात सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 07:43 AM2017-12-05T07:43:36+5:302017-12-05T16:34:06+5:30

ओखी वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे.

okhi cyclone hits mumbai | Live: ओखी चक्रीवादळ तडाखा : मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू, किनारपट्टी परिसरात सतर्कतेचा इशारा

Live: ओखी चक्रीवादळ तडाखा : मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू, किनारपट्टी परिसरात सतर्कतेचा इशारा

Next

मुंबई - ओखी वादळाच्या तडाख्यामुळे मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे. वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी सोमवारी संध्याकाळी पाऊस झाला. मंगळवारीदेखील पहाटेपासून पाऊस पडत आहे.

Live Updates :

पुढील 48 तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

महापरिनिर्वाणदिनासाठी पोहोचलेल्या अनुयायांनी चौपाटीवर जाऊ नये, प्रशासनाची विनंती

मुंबई-कोकणच्या किनारी भागात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी सोसाट्याचा वारा

आज मुंबई-ठाणे-रायगड जिल्ह्यांतील शाळांना सुटी

समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी जाऊ नये, प्रशासनाचा इशारा

वरळी सी लिंक वाहतुकीस खुला आहे. कोणत्याही प्रकारे वाहनांना धोका नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका, पोलिसांचं आवाहन.

कोकण, मुंबईच्या किनाऱ्यावर धडकलेल्या ओखी वादळामुळे मुंबईत सोमवारी (4 डिसेंबर)रात्रीपासून अनेक भागात पाऊस

मुंबई : हवाई वाहतुकीवर परिणाम, विमान सेवा 40 मिनिटं उशिरानं

आज संध्याकाळपर्यंत वादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार 

नवी मुंबईत पावसाच्या सरी कायम 
सकाळी 8.30 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास झालेली पावसाची नोंदी
बेलापूर - 5 मिमी
नेरुळ  - 5.20 मिमी
वाशी  - 3.80 मिमी
ऐरोली - 3.00 मिमी

ओखी वादळाचा परिणाम :  24 तासांत मुरुड येथे सर्वाधिक 35 मिमी पाऊस
२४ तासांत जिल्ह्यात मुरुड येथे सर्वाधिक ३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित ठिकाणी म्हसळा २९.४ मिमी, सुधागड २७ मिमी, पेण २२.४मिमी, अलिबाग २१ मिमी. ,श्रीवर्धन २०मिमी, खालापूर,पोलादपूर  व उरण १६ मिमी, माथेरान १४ मिमी, पनवेल ११.४,कर्जत १०.४, रोहा ८ मिमी, महाड येथे ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

मासेमारीत वेसावा कोळीवाड्याचा केरळनंतर दुसरा क्रमांक लागत असून येथे 350 मासेमारी नौका आहेत. ओखी वादळामुळे वेसावा बंदरावर बोटी शाकारल्या असून आठ दिवसांपूर्वी खोल समुद्रात  मासेमारीला गेलेल्या काही बोटी इतर बंदरावर शाकारल्या आहेत,  अशी माहिती वेसावा नाखवा मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र काळे यांनी दिली.

दादर- शिवाजी पार्कात साचलं पावसाचं पाणी

रत्नागिरी-दापोली



मध्य रेल्वेची वाहतूक 20 मिनिटे उशिरानं

लासलगाव (नाशिक) - काही भागात पावसाची हजेरी. द्राक्षांचे नुकसान होण्याची भीती. या अस्मानी संकटामुळे द्राक्षे उत्पादकांच्या उत्पन्न-उत्पादनात घट होण्याची भीती

समुद्रालगतच्या जिल्ह्यांतील शाळांना आज सुट्टी!
मुंबईच्या किना-यावर घोंगावणा-या ओखी वादळाच्या इशा-यानंतर मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी उशिरा जाहीर करण्यात आला.या जिल्ह्यांतील महाविद्यालये आणि विद्यापीठ सुरूच राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी दिली आहे.

वादळाचा मोर्चा सुरतकडे!
‘ओखी’ चक्रीवादळाने मोर्चा गुजरातकडे वळविल्याने, मुंबईसह कोकण किनारपट्टीचा धोका कमी झाला आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या १८३ खलाशी आणि मच्छीमारांची सुटका केल्याची माहिती, तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे महानिरीक्षक के. आर. नौटियाल यांनी सोमवारी दिली. महाराष्ट्रापासून ४५ सागरी मैलांवर घोंगावणाºया ‘ओखी’ने दिशा बदलली आहे. गुजरातच्या दिशेने वादळ घोंगावल्याने मुंबईवरील धोका टळला आहे. ताशी १०० मैल वेगाने वाहणारे वारे आणि ५ ते ६ मीटर उंचीच्या लाटांमुळे मच्छीमार व खलाशांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता.

Web Title: okhi cyclone hits mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.