मुलांवर सेकंड हॅण्ड स्मोकचा परिणाम
By Admin | Updated: December 16, 2015 00:08 IST2015-12-15T23:57:27+5:302015-12-16T00:08:05+5:30
धुम्रपान सोडण्याचे आवाहन : ‘डब्ल्यूएलएफ’ची सोशल मीडिया मोहीमही सुरू

मुलांवर सेकंड हॅण्ड स्मोकचा परिणाम
कोल्हापूर : सेकंड हॅण्ड स्मोक (एसएचएस) मुळे लहान मुलांवर होणाऱ्या घात परिणामांचा इशारा देणारी नवीन मास मीडिया मोहीम राबविल्याबद्दल वर्ल्डलंग फौंडेशन (डब्ल्यू एलएफ) ने सोमवारी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन कले.
टोबॅको इझ ईटिंग युअर बेबी अलाईव्ह’ (तंबाखू तुमच्या मुलाला जिवंतपणीच फस्त करतो आहे) या मोहिमेमध्ये तंबाखूच्या आणि त्याच्या धुराच्या संपर्कात आल्यास लहान मुलांवर होणारे सडन इन्फण्ट डेथ सिंडोम (एसआयडीएस), शरीर खिळखिळे करणारा अस्थमा, अतिशय वेदनादायक कानाचा संसर्ग, न्युमोनिया आणि जन्मावेळी नवजात अर्भकांचे वजन कमी असणे हे परिणाम दर्शविण्याकरिता अतिशय जिवंत व ठळक इमेजरीचा वापर करण्यात आला होता. ही मोहीम खास महाराष्ट्रकरिता महाराष्ट्र सरकाराद्वारा मराठी भाषेमध्ये राबविण्यात आली. या मोहिमेला राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य कल्याण खात्याचे सहाय आणि वर्ल्ड लंग फौंडेशनचे तंत्र व आर्थिक सहाय लाभले होते. मास मीडिया मोहिमेतील संदेश सर्वदूर पोहोचविण्याकरिता ‘डब्ल्यूएलएफ’ने सोशल मिडिया मोहिमही सुरू केली आहे.
२३ नोव्हेंबर २०१५ पासून चार आठवड्यांच्या कालावधीकरिता ३० सेकंदाची एक पब्लिक सर्व्हिस अनाऊंसमेंट (पीएसए) भारतभरातील सर्व महत्त्वपूर्ण टी.व्ही. आणि रेडिओ चॅनेल्स्वर प्रसारित केली जात आहे. या ‘पीएसएम’मधून मुलांच्या आजूबाजूला धुम्रपान केल्याने त्यांच्या शरीरामध्ये सायनाईड आणि कार्बन मोनॉक्साईडसारख्या ‘एसएचएस’चा शिरकाव होऊन त्यांना प्रकृतीच्या अतिशय गंभीर समस्या कशा उद्भवू शकतात, हे परिणामकारकरीत्या सांगण्यात आले आहे. या ‘पीएसएम’मधून सिगारेट आणि बिडी पिणाऱ्यांना स्वत:ला व त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या त्यांच्या प्रियजणांना तंबाखूच्या हानीकारक परिणामांपासून दूर ठेवण्याकरिता धुम्रपान सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.