६०३ जणांना दुसरा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:15+5:302021-06-20T04:18:15+5:30
कोल्हापूर : शहरात शनिवारी ९ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये ६० वर्षांवरील २१४ नागरिकांना कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा पहिला ...

६०३ जणांना दुसरा डोस
कोल्हापूर : शहरात शनिवारी ९ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये ६० वर्षांवरील २१४ नागरिकांना कोविशिल्ड, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस तर, ६०३ जणांना दुसरा डोस देण्यात आला. एकूण ८१७ जणांना लसीकरण करण्यात आले.
प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे नऊ, फिरंगाई येथे १२०, राजारामपुरी येथे १०२, पंचगंगा येथे ५९, कसबा बावडा येथे १०, महाडिक माळ येथे १२८, फुलेवाडी येथे १०८, सिद्धार्थनगर येथे ३९, मोरे मानेनगर येथे १५ व सीपीआर हॉस्पिटल येथे १३७ इतक्या नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
शहरामध्ये आजअखेर १ लाख २४ हजार ७१ जणांना पहिल्या डोसचे तर, ४५ हजार ३४ जणांना दुसरा डोस देण्यात आला. कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्यांनी कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्यांचे ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत, अशा नागरिकांनी आज, रविवारी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या लाभार्थ्यांचे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्यांनी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले येथे उपस्थित राहावे, असेही आवाहन महापालिका आरोग्य प्रशासनाने केले आहे.