शित्तूर-वारुण परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वळीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST2021-05-07T04:26:59+5:302021-05-07T04:26:59+5:30
: शित्तूर-वारुण : शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वळवाच्या पावसाने ...

शित्तूर-वारुण परिसरात सलग दुसऱ्या दिवशी वळीव
: शित्तूर-वारुण : शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वळवाच्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. अंगाची लाहीलाही होत होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. या पावसामुळे ऊस पिकाला लागणारे पाणी वाचत असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पावसामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.