बेपत्ता असलेल्या कुंभोजचा तरुणाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:17 IST2021-07-02T04:17:23+5:302021-07-02T04:17:23+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोळी याने जाफळे येथील तरुणीशी विवाह केला होता. विवाहानंतर तो सासरी ...

The search for the missing Kumbhoj youth | बेपत्ता असलेल्या कुंभोजचा तरुणाचा शोध

बेपत्ता असलेल्या कुंभोजचा तरुणाचा शोध

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोळी याने जाफळे येथील तरुणीशी विवाह केला होता. विवाहानंतर तो सासरी राहावयास होता. दोन वर्षांपूर्वी कुंभोज येथे राहत असलेल्या आई-वडिलांना भेटायला जातो, असे पत्नीला सांगून तो बाहेर पडला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही, म्हणून पत्नीने तो बेपत्ता असल्याबाबतची फिर्याद कोडोली पोलिसांत दिली होती. स.पो.नि. दिनेश काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी नरेंद्र पाटील यांनी व त्यांच्या पथकाने शोध घेतला असता चिंचणी येथे तो सापडला. दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणास एका महिन्यात पोलिसांनी शोधून काढले. आज पोलिसांनी कोळी यास पत्नी स्वाती व आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

Web Title: The search for the missing Kumbhoj youth