शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा शोध, निवड समितीसाठी तीन नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 17:53 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची कुलगुरूपदाची पाच वर्षांची मुदत येत्या ७ ऑक्टोबरला संपणार असल्याने ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची कुलगुरूपदाची पाच वर्षांची मुदत येत्या ७ ऑक्टोबरला संपणार असल्याने कुलपती कार्यालयाने आता नव्या कुलगुरूंची शोधमोहीम प्रक्रिया सुरू केली आहे.

कुलपती कार्यालयाकडून लवकरच कुलगुरू निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या वतीने एका सदस्याचे नाव निवड समितीसाठी पाठवण्याच्या सूचना कुलपती कार्यालयाकडून विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या वतीने निवड समितीसाठी तीन नावे पाठवण्यास सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.सध्याचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ७ ऑक्टोबर २०२० रोजी प्रभारी कुलगुरू नितीन करमळकर यांच्याकडून कार्यभार स्वीकारला होता. डॉ. शिर्के यांचा ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यामुळे कुलपती कार्यालयाने कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी कुलपती कार्यालयाने कुलगुरू निवड समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचा एक सदस्य देण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने तातडीची व्यवस्थापन परिषदेची बैठक घेतली. या बैठकीमध्ये इंदोर येथील आयआयटीचे संचालक सुहास जोशी, हैद्राबाद येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड सायन्सचे कुलगुरू व्ही. रामगोपाल राब, पंजाबमधील रोपार येथील आयआयटीचे संचालक राजीव अहुजा ही तीन नावे कुलपती कार्यालयास पाठवण्यास मान्यता देण्यात आली. कुलपती कार्यालयाकडून या तीनपैकी एका सदस्याची निवड कुलगुरू निवड समितीसाठी केली जाणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ