शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:26 IST

हृदयद्रावक घटनेने हळहळ

उचगाव : सरनोबतवाडी येथे गुरुवारी ढगफुटीसदृश पाऊस झाला. दरम्यान, उजळाईवाडी-सरनोबतवाडीतील संगम-अमृत नगर कॉलनी (धोंडेनगर) येथील अमन जमालुद्दीन भालदार (वय ११) हा सहावीत शिकणारा मुलगा सरनोबतवाडी येथे खासगी क्लाससाठी सायकलवरून जात असताना पावसाने रस्त्यावर आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहाबरोबर वाहून गेला. अद्याप त्याचा शोध लागला नाही. याबाबत मिळालेली माहिती अशी, अमन हा राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, कोल्हापूर येथे सहावीत शिक्षण घेत होता. सायंकाळी साडेपाच वाजता खासगी क्लाससाठी सायकलवरून तो सरनोबतवाडी येथे जात होता. यावेळी ओढ्याच्या पुलावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तो सायकलसह पाण्यात उतरला, मात्र त्याचा तोल जाऊन तो प्रवाहाबरोबर वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे, अन्य अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. ओढ्याच्या काठी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. अमनची आई मुमताज यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.ओढ्याच्या शेजारी असलेल्या वीटभट्टीवरील कामगारांनी अमनला वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याच्या जॅकेटमध्ये पाणी भरल्यामुळे जॅकेट त्याच्या तोंडाला गुंडाळले गेले. त्यामुळे त्याचा तोल गेला व ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. आज, शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. अद्याप त्याचा शोध लागला नाही.