मृतदेहाच्या अवयवांचा पाणबुड्यांद्वारे शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:13 IST2021-02-20T05:13:13+5:302021-02-20T05:13:13+5:30
कोल्हापूर : पाचगावमधील वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयित संतोष परीट यास न्यायालयात हजर केले असता त्यास मंगळवार (दि. २३) पर्यंत ...

मृतदेहाच्या अवयवांचा पाणबुड्यांद्वारे शोध
कोल्हापूर : पाचगावमधील वृद्धेच्या खून प्रकरणातील संशयित संतोष परीट यास न्यायालयात हजर केले असता त्यास मंगळवार (दि. २३) पर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली. दरम्यान मृतदेहाच्या अवयवांचा शोध पाणबुड्यांद्वारे पोलिसांनी घेतला. मात्र, काहीच हाती लागले नाही.
सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी शांतबाई आगळे-गुरव या वृद्धेचा संशयित परीट याने खून केला. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरला. ते पोते राजाराम तलाव परिसरात टाकून दिले होते. पोलिसांच्या तपासात त्या वृद्धेचे केवळ काहीच अवयव मिळून आले. काही अवयव मिळाले नाहीत. त्याचा शोध पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून तलावात पाणबुड्यांद्वारे केला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. संशयिताची कोठडी संपल्यानंतर पुन्हा त्यास अधिकचा तपास करण्यासाठी न्यायालयात हजर केले असता २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. अशी माहिती पोलीस निरीक्षक एस.एल. डुबल यांनी दिली.