राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर शनिवारी उमटणार मोहर
By Admin | Updated: May 8, 2014 12:01 IST2014-05-08T12:01:31+5:302014-05-08T12:01:31+5:30
पुणे पदवीधर मतदारसंघ : राजेश पाटील-वाठारकर, सारंग पाटील, अरुण लाड यांची फिल्डिंग

राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर शनिवारी उमटणार मोहर
कºहाड पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जुलैच्या पहिल्या दुसर्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच पुणे पदवीधर मतदार संघातील राजकारण जोर धरू लागले आहे. पदवीधर मतदार संघातील राजकारणही तापू लागले आहे. भाजपने सुमारे आठ महिन्यांपूर्वीच उमेदवार निश्चित केला आहे. मात्र, प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. शनिवारी मुंबई येथे पक्षाच्या बैठकीत या उमेदवारीवर मोहर लावली जाणार असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या वर्तुळात सुरू आहे. पुणे पदवीधर मतदारसंघ हा अपवाद वगळता भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. शरद पाटील वगळता इतर कोणाला या बाले किल्ल्याला शह देणे शक्य झालेले नाही. गत निवडणुकीत भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी हा गड पुन्हा ताब्यात घेतला खरा! पण राजेश पाटील-वाठारकरांनी दिलेली कडवी झुंज दुर्लक्षित करण्यासारखी नक्कीच नाही. भाजपाने आमदार चंद्रकांत पाटील यांना गत आठ महिन्यांपूर्वीच उमेदवार म्हणून निश्चित करून आघाडी घेतली आहे. त्यांची प्रचारयंत्रणा वेगात सुरू आहे. याउलट जो जास्त मतदार करेल, त्याला उमेदवारी असे भाष्य करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षांतर्गत इच्छुकांच्यात स्पर्धा लावली आहे. त्यामुळे राजेश पाटील-वाठारकर (कºहाड), सारंग पाटील (कºहाड), अरुण लाड (सांगली), शरद बुट्टे (पुणे) या चार इच्छुकांनी गत वर्षभरात पाच जिल्ह्यांचा हा मतदारसंघ अक्षरश: पिंजून काढला आहे. मीच सर्वाधिक मतदार केल्याचे दावे, हे इच्छुक करीत आहेत. शनिवारी अजित पवारांच्या समोर याचा लेखाजोखा होणार असून, गुणवत्तेच्या जोरावर उमेदवार निवडला जाणार आहे म्हणे! दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या काही इच्छुकांनीही तयारी केली आहे. राज्यात दोन्ही काँग्रेसची आघाडी आहे. ती पदवीधर मतदार संघसाठीही कायम राहिल्यास काँग्रेसमधील इच्छुक बंडखोरी करण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादीतही ‘एक’ उमेदवार उमेदवारी मिळो अथवा न मिळो रिंगणात आहेच, या पवित्र्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला भाजपच्या गडाला शह देण्यासाठी विचारपूर्वक उमेदवार निवडावा लागणार, हे निश्चित!