बारा तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनचे सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST2021-01-13T05:02:11+5:302021-01-13T05:02:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. रविवारी ...

Seal of EVM machine of twelve talukas | बारा तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनचे सील

बारा तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनचे सील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी वापरले जाणारे ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. रविवारी दहा तालुक्यांचे व सोमवारी हातकणंगले व आजरा या दोन तालुक्यांचे मशीन सील करण्यात आले.

जिल्ह्यातील ४३३ पैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्याने सध्या ३८६ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यासाठी ७ हजार ६५७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी रविवारी जिल्ह्यातील दहा तालुक्यांसाठीच्या ईव्हीएम मशीनची तपासणी करून सील करण्यात आले. ही तपासणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. खराब व तांत्रिक बिघाड झालेल्या मशीन बाजूला काढण्यात आल्या. सोमवारी दिवसभर हातकणंगले आणि आजरा या दोन तालुक्यांच्या ईव्हीएम मशीनची तपासणी व सील करण्याची प्रक्रिया सुरू होती. अशा रीतीने बाराही तालुक्यांसाठीचे मशीन सील करण्याचे काम संपले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

--

फोटो नं ११०१२०२१-कोल-हातकणंगले ईव्हीएम

ओळ : ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी म्हणून सोमवारी हातकणंगले तालुक्यातील ईव्हीएम मशीनला प्रशासनाकडून सील करण्यात आले.

--

Web Title: Seal of EVM machine of twelve talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.