वाठारच्या पुलाखालील मूर्तीकारांना मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:25 IST2021-05-20T04:25:43+5:302021-05-20T04:25:43+5:30
नवे पारगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे पुणे-बंगळूर महामार्गावरील उड्डाण पुलाखाली ऊन, वारा व थंडीत जीवन जगण्यासाठी ...

वाठारच्या पुलाखालील मूर्तीकारांना मिळाला आधार
नवे पारगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे पुणे-बंगळूर महामार्गावरील उड्डाण पुलाखाली ऊन, वारा व थंडीत जीवन जगण्यासाठी धडपड करणाऱ्या मूर्तींकारांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब लक्षात येताच औषध निर्माण अधिकारी असलेल्या दत्तात्रय शिर्के यांनी प्रापंचिक साहित्य देऊन आधार दिल्याने समाजात माणुसकीचे दर्शन घडले.
गेली अनेक वर्षे शिवाजी महाराजांच्या मूर्तींसह अन्य मूर्ती घडविणारी दोन कुटुंबं वाठार येथील महामार्ग उड्डाण पुलाखाली वास्तव्यास आहेत. शिवाजी महाराजांच्या जयंतीसह अन्यवेळी मूर्ती विक्रीतून त्यांचे कुटुंब चालत होते. काही महिन्यांपूर्वी या कुटुंबांची पुलाखालून हकालपट्टी झाली. नाना चौगुले यांच्या सहकार्याने जागा मिळाल्याने ही कुटुंबे झोपड्या बांधून पुन्हा मूर्ती घडविण्याचे काम करू लागले. गतवर्षीही कोरोनाचा फटका बसला होता.
लॉकडाऊनने मूर्तीकार अडचणीत आले होते. आरोग्य विभागात पलूस येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दत्तात्रय शिर्के कार्यरत आहेत. त्यांनी माणुसकी जपत गोरगरिबांना ‘एक हात मदतीचा’ म्हणून मूर्तीकार कुटुंबांना प्रापंचिक साहित्य ग्रामपंचायत सदस्य महेश शिर्के, सुमीत शिर्के, नाना चौगुले, महंमद राजू पटाईत यांच्याहस्ते केले.
फोटो ओळी : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथील पुलाखालील मूर्तीकारांना कौटुंबिक साहित्य वाटप करताना ग्रामपंचायत सदस्य महेश शिर्के, सुमीत शिर्के, हाजी महंमद राजू पटाईत, नाना चौगुले.