एस.टी.च्या वर्कशॉपमधील स्क्रॅपला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:52+5:302021-02-05T07:09:52+5:30
कोल्हापूर : येथील ताराबाई पार्कमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयशेजारी असणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत ...

एस.टी.च्या वर्कशॉपमधील स्क्रॅपला आग
कोल्हापूर : येथील ताराबाई पार्कमधील प्रादेशिक परिवहन कार्यालयशेजारी असणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत सुमारे दीड लाख रुपये किमतीचे स्क्रॅपचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे सुमारे दोन तासाच्या अथक परिश्रमाने ही आग विझवली.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाशेजारी (आरटीओ) एस.टी. महामंडळाचे वर्कशॉप आहे. या वर्कशाॅपच्या खुल्या जागेत एस.टी. बसेसचे स्क्रॅप मोठ्या प्रमाणात विखुरले आहे. मंगळवारी दुपारी अचानक या स्क्रॅपला आग लागली. या आगीत बसेसच्या स्क्रॅमध्ये टाकलेल्या सीटस, टायर, आदी सुमारे दीड लाख रुपयांचे सहित्य जळून खाक झाले. महापालिकेच्या ताराराणी चाैकातील अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या जवानांनी सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणली.