शाळा राहणार आज बंद

By Admin | Updated: January 14, 2015 00:27 IST2015-01-13T00:00:59+5:302015-01-14T00:27:02+5:30

मोर्चा काढणार : प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

Schools will be closed today | शाळा राहणार आज बंद

शाळा राहणार आज बंद

कोल्हापूर : पूर्वीप्रमाणे वेतनेतर अनुदान मिळावे, कोणत्याही परिस्थितीत एक तारखेला वेतन मिळावे, अशा विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक उद्या, मंगळवारी ‘शाळा बंद’ आंदोलन करणार आहेत, तसेच दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकांच्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासह असहकार आंदोलनातील पहिला टप्पा म्हणून संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ६ जानेवारीला काळ्या फिती लावून काम केले. त्याचा पुढील टप्पा म्हणून मंगळवारी जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या ७५० शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. शहरातील गांधी मैदानातून दुपारी साडेबारा वाजता मोर्चा सुरू होईल. (प्रतिनिधी)


मागण्या अशा...
शिक्षक भरतीवरील बंदी उठविण्यात यावी.
शक्षकेतर सेवकांसाठीचा सुधारित आकृतिबंध रद्द करावा.
अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय संंबंधित शाळेतील शिक्षकांचे पगार मूळ शाळेतून काढावे.

Web Title: Schools will be closed today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.